Budget 2023: अर्थसंकल्पावर विवेक अग्रिहोत्री यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा अर्थसंकल्प अत्यंत...'
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांचे कौतुक केले आहे.
Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे कौतुक केले आहे.
विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'हा अर्थसंकल्प अत्यंत चांगला आहे. नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन. मोर पावर टू भारत' त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये नव्या कर रचनेच्या निर्णयाचं देखील कौतुक केलं आहे.
Brilliant budget.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 1, 2023
Congratulations @narendramodi and @nsitharamanoffc.
More power to Bharat.
Brilliant decision to increase slab from 5L to 7 L. Wow!
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 1, 2023
विवेक अग्निहोत्री हे चित्रपटांबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यातून विविध विषयांवर मत मांडत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
विवेक अग्निहोत्री यांचे चित्रपट
विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सीन वॉर हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी या देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.
विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 11 मार्च 2022 रोजी द कश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात पल्लवी जोशी यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली होती. तसेच चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती.
महत्वाच्या इतर बातम्या: