एक्स्प्लोर
न्यू इयर सेलिब्रेशनला गेलेल्या विराट-अनुष्काकडून व्हिडीओ शेअर!
डेहराडून : जुनं वर्ष सरत आलं आहे, नव्या वर्षाच्या स्वागताची सगळीकडे लगबग सुरु आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेत्री अनुष्का शर्मा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये दाखल झाली आहे.
पण डेहराडूनसारख्या रोमँटिक शहरात अनुष्कासोबत दुसरा तिसरा कोणी नाही तर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि बॉयफ्रेण्ड विराट कोहली होता. डेहराडून विमानतळावर विराट आणि अनुष्का एकत्र दिसले होते. त्यानंतर विराट आणि अनुष्का एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करणार असल्याचा अंदाज वर्तवला दोता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा उत्तराखंडला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हरीश रावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दोघांचं स्वागत केलं. विराट आणि अनुष्का तुमचं उत्तराखंडमध्ये स्वागत. उत्तराखंड दौरा अविस्मरणीय ठरेल, अशी आशा आहे, असं ट्वीट रावत यांनी केलं.
https://twitter.com/harishrawatcmuk/status/812651098288701440
दरम्यान, अनुष्काने डेहराडूनमधील एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का एका मोराला स्वत:च्या हाताने खायला घालत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement