(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vikrant Massey Retirement: विक्रांत मेस्सी संन्यास घेत नाहीय, म्हणाला, "लोकांनी चुकीचं वाचलं"; मग त्यानं केलेल्या पोस्टचा अर्थ काय?
Vikrant Massey Retirement: विक्रांत मेस्सीनं अखेर संन्यास घेत असल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लोकांनी त्याच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला, असं त्याचं म्हणणं आहे.
Vikrant Massey Retirement: 12th फेल (12th Fail), सेक्टर 36 (Sector 36) मधून आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडणाऱ्या विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. विक्रांत मेस्सीनं सिनेसृष्टीपासून संन्यास घेत असल्याची घोषणा आपल्या पोस्टमधून केल्याचं सगळीकडे पसरलं आणि सर्वांना धक्का बसला. पण, आता स्वतः अभिनेत्यानं त्याच्या पोस्टबाबत मोठा खुलासा केला आहे. कदाचित विक्रांतनं जे स्पष्टीकरण दिलंय ते ऐकून चाहत्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळेल.
News18 Showsha शी बातचित करताना विक्रांत मेस्सीनं म्हटलं की, तो रिटायर होत नाहीय. तर, त्याला सिनेसृष्टीपासून एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. विक्रांत म्हणाला की, मी रिटायर नाही, फक्त खपू थकलोय आणि एका मोठ्या ब्रेकवर जातोय. माझी तब्येतही ठीक नाहीय. लोकांनी माझ्या पोस्टमध्ये चुकीचं वाचलं आणि गैरसमज करुन घेतला.
विक्रांत मेस्सीनं नेमकी काय पोस्ट केली होती?
विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलेलं की, "नमस्कार, गेली काही वर्ष आणि त्यानंतरची काही वर्ष खूपच शानदार होती. मी तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण, जसजसा मी पुढे जातोय, मला जाणवलंय की, आता रिकेलिब्रेट करणं आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि एका मुलाच्या रुपात आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या 2025 वर्षात आपण शेवटचं एकमेकांना भेटू, जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही तोपर्यंत... शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद, या दरम्यानच्या सर्व गोष्टींसाठी सदैव ऋणी... ”
पंतप्रधानांनी पाहिला विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट'
विक्रांत मेस्सीचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात हा चित्रपट पाहिला आणि त्याचं कौतुकही केलं. हा चित्रपट गोध्रा येथे घडलेल्या विवादित घटनेवर बनला आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरनं केली आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गतवर्षीच, 12th फेलमध्ये आयपीएस मनोज कुमार शर्माच्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीला खूप प्रशंसा मिळाली, त्याच्या ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या फिर आयी हसीन दिलरुबा, या ओटीटीवरच्या चित्रपटातील रिशूनंही प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. नुकताच अभिनेत्याचा साबरमती रिपोर्ट हा चित्रपट प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या चित्रपटासाठी त्याचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :