Sam Bahadur: "जिंदगी उनकी, इतिहास हमारा"; विकी कौशलनं शेअर केलं सॅम बहादुर चित्रपटाचं नवं पोस्टर, टीझर 'या' दिवशी होणार रिलीज
विकी कौशलनं (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Sam Bahadur: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) हा सॅम बहादुर (Sam Bahadur) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामधील विकी हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतेच विकीनं सॅम बहादुर या चित्रपटाचे एक नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
विकीनं शेअर केलेल्या सॅम बहादुर चित्रपटाच्या पोस्टरवर "जिंदगी उनकी, इतिहास हमारा" असं लिहिलेलं दिसत आहे. विकीनं या पोस्टरला कॅप्शन दिलं, "To a life well lived" सॅम बहादुर चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी देखील सॅम बहादुर चित्रपटाचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार टीझर?
तरण आदर्श यांनी ट्वीट शेअर करुन सॅम बहादुर चित्रपटाच्या टीझरबाबत माहिती दिली होती. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "13 ऑक्टोबर रोजी 'सॅम बहादुर' टीझर रिलीज होत आहे. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या 'सॅम बहादुर' या चित्रपटाच्या टीमनं 13 ऑक्टोबर 2023 रोजी या चित्रपटाचा टीझर लाँच करायचं ठरवलं आहे14 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या NDvsPAK या वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यात देखील टीझर प्रदर्शित केला जाईल, असं म्हटलं जात आहे."
VICKY KAUSHAL: 'SAM BAHADUR' TEASER ON 13 OCT... Team #SamBahadur - based on the life of Field Marshal #SamManekshaw - will launch the teaser on 13 Oct 2023… Subsequently, the teaser will be screened at the much-awaited #INDvsPAK #WorldCup2023 match on 14 Oct 2023.
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2023
Stars… pic.twitter.com/WEOn8D4Trj
'सॅम बहादुर' चित्रपटाची स्टार कास्ट
'सॅम बहादुर' याचित्रपटामध्ये विकीसोबत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या 13 दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. सान्या मल्होत्रा ही या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू मंकशॉची भूमिका साकारणार आहे आणि फातिम सना शेख या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sam Bahadur: 'सॅम बहादुर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; विकीनं शेअर केली पोस्ट