Vicky kaushal Gift To Katrina kaif : कतरिनासोबत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी विकी कौशलनं शूटींगमधून घेतला ब्रेक
Vicky kaushal Gift To Katrina kaif : नव्या वर्षाच्या सुरुवातीला विकी कौशलने कतरिना कैफला खास भेट दिली आहे.
Vicky Kaushal Surprise to Katrina Kaif : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) 9 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले असून त्यांचे लग्नसोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नाताळच्या सुट्टीनंतर विकी त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी इंदौरला रवाना झाला. दरम्यान विकी कौशलने नवीन वर्षाच्या सुरुवातीला कतरिनाला खास भेट दिली आहे.
शुक्रवारी विकी विमानतळावर स्पॉट झाला होता. पत्नीसोबत नववर्षाचे स्वागत करता यावे यासाठी विकीने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. यापूर्वी दोघांनी नाताळदेखील एकत्र साजरा केला होता. विकी शूटिंग सोडून कतरिनाला भेटायला इंदौरहून मुंबईत आलेला आहे. नव्या वर्षाची हीच खास भेट विकीने कतरिनाला दिलेली आहे.
View this post on Instagram
इंदौरमध्ये आगामी सिनेमाचे शूटिंग सुरू
विकी कौशल सध्या इंदौरमध्ये त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात विकीसोबत सारा अली खानदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शूटिंग दरम्यानचा सारा अली खान आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कतरिना कैफने 2021 चा शेवटचा दिवस वर्कआउटमध्ये घालवला. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. दरम्यान विकी मुंबईत आल्याने दोघांनी एकत्र नववर्षाचे स्वागत केले आहे. विकी-कतरिनाच्या लग्नाला पुढील आठवड्यात एक महिना पूर्ण होणार आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.
संबंधित बातम्या
Mrunal Thakur Corona Positive : अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण
Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha