एक्स्प्लोर

बॉलिवूडची लाडकी 'शम्मी आंटी' काळाच्या पडद्याआड

शम्मी आंटी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. जवळपास दोनशे चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

मुंबई : श्रीदेवींच्या मृत्यूच्या बातमीतून सावरत नाही, तोच आणखी एक धक्का बॉलिवूडला बसला आहे. बॉलिवूडची लाडकी 'शम्मी आंटी' अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस राबडी यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. शम्मी आंटी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. जवळपास दोनशे चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. शम्मी आंटींच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. शम्मी आंटी यांचा जन्म 1931 मध्ये मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. नर्गिस राबडी हे त्यांचं मूळ नाव. त्यांची मोठी बहीण नीना (मनी) राबडी ही फॅशन डिझायनर होती. वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. निर्माते-दिग्दर्शक सुलतान अहमद यांच्यासोबत सात वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 'उस्ताद पेद्रो' (1949) चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. गायक मुकेश यांची निर्मिती असलेला 'मल्हार' हा त्यांचा सोलो हिरोईन म्हणून पहिला चित्रपट फारसा चालला नाही. मात्र दिलीप कुमार-मधुबाला यांच्यासोबत 'संगदिल'(1952) मध्ये त्या झळकल्या, त्यानंतर शम्मी आंटींनी मागे वळून पाहिलंच नाही. शम्मी यांचे इल्जाम (1954), पहली झलक (1955), बंदिश (1955), आझाद (1955), हलकू (1956), सन ऑफ सिंदबाद (1955), राज तिलक (1958), कंगन (1959), भाई-बहन (1959), दिल अपना और प्रित पराई (1960) यासारखे चित्रपट गाजले. कुली नं. 1, खुदा गवाह, अर्थ, हम, द बर्निंग ट्रेन, गोपी किशन, हम साथ साथ है यासारख्या चित्रपटांमध्ये शम्मी आंटी दिसल्या होत्या. 90 च्या दशकात गाजलेल्या देख भाई देख, जबान संभाल के, श्रीमान श्रीमती, कभी ये कभी वो, फिल्मी चक्कर यासारख्या मालिकांमध्येही त्याचं दर्शन घडलं होतं. 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर त्या अखेरच्या झळकल्या. आणि शम्मी नाव पडलं... दिग्दर्शक तारा हरिश यांनी नर्गिस राबडींना 'शम्मी' असं नाव बदलून घेण्यास सुचवलं. त्यावेळी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री नर्गिसचं वर्चस्व असल्यामुळे नर्गिसची शम्मी झाली. पुढे मायाळू शम्मी बॉलिवूडची लाडकी 'शम्मी आंटी' झाली. 1949 मध्ये तब्बल 500 रुपये महिना इतक्या पगारावर शम्मीने दिग्दर्शकासोबत तीन वर्षांचा करार केला. त्यानुसार दिग्दर्शकाच्या परवानगीविना ती बाहेर चित्रपटात काम करु शकत नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Sabesh Death: आधी प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 3 दिवसांत अभिनेता पुतण्याने सोडले प्राण; तरुण वयात अखेरचा श्वास, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
आधी प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 3 दिवसांत अभिनेता पुतण्याने सोडले प्राण; तरुण वयात अखेरचा श्वास, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Rajkumar Hirani Sanju Movie: संजय दत्तच्या आयुष्यावरचा सुपरहिट 'संजू' बनवणाऱ्या राजकुमार हिरानींची पुढच्या बायोपिकसाठी खास अट; काय म्हणाले?
संजय दत्तच्या आयुष्यावरचा सुपरहिट 'संजू' बनवणाऱ्या राजकुमार हिरानींची पुढच्या बायोपिकसाठी खास अट; काय म्हणाले?
Tiger Shroff Fan Shoot: घरी प्रेग्नेंट बायको, 6 वर्षांचा मुलगा; ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टायगर श्रॉफच्या फॅनला लागली गोळी, डॉक्टर म्हणाले..
घरी प्रेग्नेंट बायको, 6 वर्षांचा मुलगा; ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टायगर श्रॉफच्या फॅनला लागली गोळी, डॉक्टर म्हणाले..
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Embed widget