(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhuri Pawar : महेश मांजरेकरांच्या 'वेडात वीर दौडले सात' ऐतिहासिक सिनेमात झळकणार माधुरी पवार!
Vedat Marathe Veer Daudle Saat : बहुचर्चित 'वेडात वीर दौडले सात' मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची लागली वर्णी लागली आहे.
Madhuri Pawar On Vedat Marathe Veer Daudle Saat : 'महाराष्ट्राची महाअप्सरा' अशी ओळख असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने (Madhuri Pawar) आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील 'वाहिनीसाहेब' ही व्यक्तिरेखा असो की 'रानबाजार' वेबसिरीज मधील राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील सानेची भूमिका असो माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे.
अभिनेत्री माधुरी पवारने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत 'टाइप कास्ट' न होता आपल्या दमदार अभिनयातून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. आता माधुरीच्या चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. माधुरी लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित, मराठी-हिंदीसह पाच भाषांमध्ये निर्मिती होत असलेल्या 'वेडात वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या भव्य ऐतिहासिक सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी पवार नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
तगडी स्टारकास्ट असलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात सुपस्टार अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसणार आहे. तसेच हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
खिलाडीकुमारचं मराठी सिने-सृष्टीत पदार्पण
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमातील अक्षयच्या निवडीवर सध्या सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'हर हर महादेव' आणि 'शिवप्रताप गरुडझेप' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला होते. यात 'हर हर महादेव' सिनेमात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महजाराजांच्या भूमिकेत होता. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या सिनेमात शिवरायांची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या