एक्स्प्लोर

Bhediya Trailer Out: हॉरर अन् कॉमेडीचा तडका! वरुण धवन-क्रिती सेननच्या ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

Bhediya Trailer Out: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

Bhediya Trailer Out: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यानंतर, या चित्रपटातील वरुण धवन आणि क्रिती सेननचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये वरुण धवन ‘भेडिया’ अर्थात लांडग्याच्या खतरनाक अवतारात दिसला, तर 'मिमी' फेम अभिनेत्री क्रिती सेननच्या पूर्णपणे वेगळ्या लूकनेही चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.

जिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात वरुण एका इच्छाधारी ‘भेडिया’ची भूमिका साकारत असल्याचे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. जंगलात एक लांडगा चावल्यानंतर वरुणला संसर्ग होतो आणि नंतर तो स्वतः देखील लांडगा बनून दहशत पसरवतो.

पाहा जबरदस्त ट्रेलर :

अभिनेत्री क्रिती सेनन या चित्रपटात डॉक्टर कनिकाची भूमिका साकारत असून, संसर्ग झालेल्या वरुणला बरे करण्याचा प्रयत्न ती करत आहे. त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल या अभिनेत्यांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या ट्रेलरवरून हा चित्रपट केवळ हॉरर नसून, याला कॉमेडीचा तडका देखील असणार आहे.

चित्रपटाला कॉमेडीचा तडका

एकीकडे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे वरुण धवनचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर कळते की, वरुण धवनला जंगलातून जाताना एक लांडगा चावला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये अचानक बदल होऊ लागतात. वरुण धवन हळूहळू इच्छाधारी लांडगा बनू लागतो. ट्रेलरमध्ये ‘जंगल में कांड हो गया’ हे गाणे देखील आहे. आज वरुण धवनला बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण होत आहेत. याच खास निमित्ताने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

या ट्रेलरमध्ये क्रिती सेननची भूमिका कमीच दिसली आहे. मात्र, तिने तिच्या लूक आणि स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. याशिवाय दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी आणि पॉलिन कबाक यांची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच हसवणार आहे. 'भेडिया'च्या ट्रेलरमध्ये जंगलातील सीनपासून ते क्रिती आणि वरुणमधील रोमान्सपर्यंतचे चित्रणही करण्यात आले आहे. ट्रेलरच्या शेवटी असलेले मोगलीचे 'जंगल-जंगल बात चली है' हे गाणेही ट्रेलरला आणखी मनोरंजक बनवत आहे.

हेही वाचा :

Bhediya Poster : हातात इंजेक्शन, चेहऱ्यावर हसू...कृतीच्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष; 'भेडिया' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget