Valentine Day Celebration Songs : 90 च्या दशकातील 'या' रोमँटिक गाण्यांनी साजरा करा तुमचा व्हेंलेंटाईन डे
Valentine Day Celebration Songs : या 'व्हेंलेंटाईन डे'मध्ये तुम्हाला 90 च्या दशकातील एव्हरग्रीन गाणी सोबत करू शकतात. 90 च्या दशकात आलेल्या चित्रपटांची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.
Valentine Day Celebration Songs : प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणत्या खास दिवसाची आवश्यकता नसते. कवी कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. सध्या 'व्हेंलेंटाईन डे'ची (Valentine Day) धुमधाम सुरू आहे. अनेकांनी आपल्या जोडीदारासह हा खास दिवस साजरा करण्याचे प्लानिंग केले आहे. तर, काहींनी बाहेरील गर्दी टाळण्यासाठी घरी, फार्म हाऊस किंवा इतर निवांत ठिकाणाची निवड केली असेल. या 'व्हेंलेंटाईन डे'मध्ये तुम्हाला 90 च्या दशकातील एव्हरग्रीन गाणी सोबत करू शकतात. 90 च्या दशकात आलेल्या चित्रपटांची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. ही काही खास गाणी तुमच्यासाठी. ही गाणी तुमच्या जोडीदारासाठीदेखील डेडिकेट करू शकता.
90 च्या दशकातील सुपरहिट सदाबहार गाणी आवडत नसतील असे क्वचितच कोणी असेल. त्या काळात अनेक गाणी आली जी लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी वाजवता आली. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे साठी पूर्ण प्लॅन केला असेल तर पार्टीत ही गाणी नक्की वाजवा.
९० च्या दशकातील ही गाणी व्हॅलेंटाइन डेला खास बनवतील
जर तुम्ही 90 च्या दशकातील गाणी ऐकत मोठे झाले असाल तर तुमच्या जोडीदाराला 90 च्या दशकातील गाणी नक्कीच आवडतील... तुमच्या जोडीदारालाही ही भावना व्यक्त करणारी गाणी नक्कीच आवडतील...
ये हसी वादियाँ...
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोजा या चित्रपटातील सुपरहिट गाणे स्वामी आणि मधू यांच्यावर चित्रित करण्यात आले. एसपी बालसुब्रण्यम आणि के एस चित्रा यांच्या आवाजातील गीत स्वरबद्ध केलंय ते ए.आर. रहमान यांनी...
'तेरी उम्मीद तेरा इंतेजार...'
1992 मध्ये आलेल्या दिवाना चित्रपटातील हे सुपरहिट गाणे ऋषी कपूर आणि विद्या भारती यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायले आहे. नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते. समीर यांनी लिहिलेले हे गीत आजही लोकप्रिय आहे.
सोचेंगे तुम्हे प्यार करते नहीं ...
दिवाना याच चित्रपटातील हे एव्हग्रीन गाणे आजही लोकप्रिय आहे. ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या गीताला कुमार शानू यांनी गायले. तर, नदीम-श्रवण यांनी संगीत दिले. समीर यांनी या गीताचे लेखन केले होते.
'चुरा के दिल मेरा'
1994 मध्ये आलेल्या मैं खिलाडी तू अनारी या चित्रपटातील हे सुपरहिट गाणे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीवर चित्रित करण्यात आले होते. याचे संगीत अनु मलिक यांनी दिले होते.
'धीरे-धीरे से मेरे दिल में'
1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटातील हे सुपरहिट गाणे अनुराधा पोडवाल आणि कुमार सानू यांनी गायले होते. हे गाणे भूषण दुआ यांनी संगीतबद्ध केले आहे.
'एक दिन आप यूं हमसे'
1997 मध्ये आलेल्या 'यस बॉस' चित्रपटातील हे गाणे शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायले आहे तर त्याचे संगीत जतिन-ललित यांनी दिले आहे.
'बहुत प्यार करते हैं'
1991 साली आलेल्या साजन चित्रपटातील हे सुपरहिट गाणे माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे अनुराधा पोडवाल यांनी गायले आहे, त्याचे संगीत नदीम-श्रवण यांनी दिले आहे.
'तूझे देखा तो ये'
1995 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिलवाले दुल्हनियातील हे गाणे शाहरुख खान आणि काजोलवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायले आहे, ज्याचे संगीत जतिन-ललित यांनी दिले आहे.
'होशवालों को खबर क्या'
1999 मध्ये आलेल्या सरफरोश चित्रपटातील ही सुपरहिट गझल जगजीत सिंग यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली. संगीत जतिन-ललित यांनी दिले आहे. प्रसिद्ध शायर निदा फाजली यांनी ही गझल लिहिली.