Sita Ramam : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांचा 'सीता रामम' (Sita Ramam) हा चित्रपट पाच ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपच तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये  60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटचं आता माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कौतुक केलं आहे. व्यंकय्या नायडू यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सीता रामम या चित्रपटाच्या कथानकाचे आणि कलाकारांचे कौतुक केलं आहे. 


व्यंकय्या नायडू यांचं ट्वीट
'‘सीता रामम’ हा चित्रपट पाहिला. कलाकार आणि तांत्रिक विभाग यांच्या समन्वयाने ही एक कलाकृती तयार करण्यात आली आहे. ही एक साधी प्रेमकथा आहे. जी एका वीर सैनिकासोबत जोडलेली आहे.  हा चित्रपट अनेक प्रकारच्या भावनांना मुक्त करतो आणि प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.', असं ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. 


पुढे त्यांनी लिहिलं, 'सीता रामम चित्रपटानं खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचा अनुभव दिला. युद्धाशिवाय डोळ्यांना आनंद देणारे निसर्ग सौंदर्य दाखवल्याबद्दल दिग्दर्शक श्री हनु राघवपुडी, निर्माता श्री अश्विनीदत आणि स्वप्ना मूव्ही मेकर्ससह चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन.'






सीता रामम या चित्रपटामध्ये मृणालनं सीता आणि दुलकरनं राम ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदनानं आफरीन ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामधील मृणाल आणि दुलकर सलमान यांच्या  केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता तिच्या या आगामी चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.


सीता रामम चित्रपटातील रश्मिका, दुलकर आणि मृणाल यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार तयारी करत आहे. लवकरच ती 'मिशन मजनू या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.


वाचा इतर सविस्तर बातम्या: