Laal Singh Chaddha : बॉल्वूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली. आमिरच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे नेटकरी लाल सिंह चड्ढा चित्रपटाला ट्रोल करत होते. लाल सिंह चड्ढा या चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री मोना सिंहनं (Mona Singh) प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपटाच्या कमाईवर मोना सिंहची प्रतिक्रिया
थ्री इडियट्स चित्रपटानंतर मोना सिंह आणि आमिर यांनी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात स्क्रिन शेअर केली. रिलीज झाल्यानंतर लाल सिंह चड्ढानं पहिल्या आठवड्यात 49 कोटींची कमाई केली. याबाबत जेव्हा एका मुलाखतीमध्ये मोना सिंहला विचारण्यात आलं त्यावेळी तिनं प्रतिक्रिया दिली, 'मी फिल्मी व्यक्ती नाही आणि मला बॉक्स ऑफिस अजिबात समजत नाही. माझा तिसरा चित्रपट आहे. सर्वात समाधानाची गोष्ट ही आहे की ज्याने हा चित्रपट पाहिला आहे ते फक्त चांगल्या गोष्टी सांगत आहेत. तेच मी लक्षात ठेवते. मला अल्पकालीन गोष्टींबद्दल विचार करायचा नाही जसे की, किती पैसे कमावले, ते माझ्या विचारांच्या पलिकडे आहे. मला खात्री आहे की मी अशा चित्रपटाचा एक भाग आहे जो दीर्घकाळ स्मरणात राहील.' मोना सिंह आणि आमिरसोबत करीना आणि नागा चैतन्य यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
मोना सिंहनं 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामध्ये गुरप्रीत कौर ही भूमिका साकारली आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: