(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Urvashi Rautela: 'आधी इराणमध्ये आणि आता भारतात...'; उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत
नुकतीच उर्वशीनं (Urvashi Rautela ) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत आहे. नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.
उर्वशी रौतेलाची पोस्ट
उर्वशीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती दु:खी दिसत आहे. व्हिडीओला उर्वशीनं कॅप्शन दिलं, 'आधी इराणमध्ये माहसा अमिनी आणि आता भारतामध्ये.... माझ्यासोबत असंच होत आहे. ते मला स्टॅकर म्हणून चिडवत आहेत? कोणीही माझी काळजी घेत नाही किंवा मला पाठिंबा देत नाही. एक स्ट्रँग स्त्री ती असते जी प्रेम करते. ती हसते तसेच तिच्या डोळ्यांमधून अश्रू देखील येतात. ती स्वभावाने शांत आणि शक्तिशाली दोन्ही आहे, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे. स्त्री ही जगाला मिळालेली एक भेट आहे.'
View this post on Instagram
उर्वशीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
उर्वशीच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. उर्वशी तुला काय झालं आहे?' अशी कमेंट एका युझरनं केली, तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'उर्वशी आम्ही तुला असं पाहू शकत नाही'
उर्वशी आणि क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नात्याच्या चर्चा
उर्वशी रौतेला ही ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे नेहमीच बोलले जाते. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही अनेकदा बोलले गेले होते. 28 ऑगस्ट रोजी उर्वशी ही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. तेव्हा उर्वशीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: