एक्स्प्लोर

शहीदांच्या कुटुंबीयांना उरी चित्रपटाच्या टीमकडून 1 कोटीची मदत, सेहवाग-गंभीरही आले पुढे

या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : उरी चित्रपटाच्या टीमने जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा निषेध करत देशाभरात जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. शिवाय जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचे हात पुढे आले होते. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी' हा सिनेमा बनवण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. उरीची टीम आर्मी वेल्फेअर फंडला एक कोटी देत आहे. तसेच ही रक्कम पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळावी, अशी तरतूद करण्यात येणार आहे, असं रॉनी स्क्रुवाला यांनी सांगितलं आहे. शिवाय देशवासियांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी काल पुलवामामध्ये शहीद झालेलया जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत करण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने जवानांच्या 100 मुलांना मदत करणार असल्याचं म्हंटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget