Bollywood Actress : बॉक्स ऑफिसवर महिलाराज! अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण ते कृती सेनन; 2024 गाजवणार 'या' अभिनेत्री
Bollywood Female Leads : हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूप खास आहे. या वर्षात अनेक अभिनेत्रींचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
Bollywood Female Leads 2024 : हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमांसह (Movies) महिलाप्रधान सिनेमे मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर महिलाराज असणार आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ते कृती सेननपर्यंत (Kriti Sanon) अनेक अभिनेत्रींचा 2024 मध्ये बोलबाला पाहायला मिळणार आहे. अभिनेत्रींच्या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
अनुष्का शर्मा स्टारर 'चकदा एक्सप्रेस' (Chakda 'Xpress) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. झूलन गोस्वामी यांचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या बहुचर्चित सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का पाच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. याआधी ती शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या 'झीरो' (Zero) या सिनेमात झळकली होती. 'चकदा एक्सप्रेस'ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
कृती सेनन (Kriti Sanon)
कृती सेनन 'दो पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून निर्मातीक्षेत्रात पदार्पण करत आहे. 'दो पत्ती'च्या बॅनरअंतर्गत निर्मिती होणारा कृतीचा हा पहिला सिनेमा आहे. कृतीचा हा मर्डर मिस्ट्री सिनेमा असून नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. काजोल (Kajol) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. कृतीला 2021 मध्ये 'मिमी' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आता निर्मिती म्हणून सिनेसृष्टी गाजवण्यासाठी कृती सज्ज आहे.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवण्यासाठी दीपिका सज्ज आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाने खाकी वर्दी परिधान केलेली दिसत आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमात दीपिका पादुकोण अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकासह रणवीर सिंह आणि करीना कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
शुचि तलाती
शुचि तलाती दिग्दर्शित 'गर्ल्स विल वी गर्ल्स' हा सिनेमा आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत या सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. तसेच सनडान्स चित्रपट महोत्सवात या सिनेमाला नामांकन मिळालं आहे.
संबंधित बातम्या