मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते. अशातच जान्हवीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून युजर्स जान्हवीची आई दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी तिची तुलना करत आहेत. जान्हवीने साडीतील आपले सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान, जान्हवीने मुंबईत पार पडलेल्या 'उमंग' या इव्हेंटसाठी साडीतील हा लूक कॅरी केला होता. जान्हवीच्या अदांनी चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.





सोशल मीडियावर जान्हवीचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा स्टायलिश अंदाज लोकांना प्रचंड आवडत आहे. एकीकडे जान्हवीचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत. तर काही फॅन्स श्रीदेवींची कॉपी दिसत असल्याचं म्हटले आहेत. जान्हवीच्या रेड साडीतील क्सासी आणि बोल्ड अदांवर फॅन्स लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तर तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.





दरम्यान, जान्हवीने चित्रपट 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर सोबत स्क्रिन शेअर केली होती. मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटातील ईशान आणि जान्हवीच्या जोडीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सवरील घोस्ट स्टोरीदमध्येही ते दिसून आले होते. सध्या जान्हवी आपल्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती करण जौहरचा चित्रपट 'तख्त'मध्ये दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त ती अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याचीही माहिती मिळत आहे.


संबंधित बातम्या : 


दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिद्ध; दीपिका, प्रियंकालाही टाकलं मागे


'तान्हाजी' 100 कोटींचा मानकरी, बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच


सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज; कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार


'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज


Shikara Trailer: काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा 'शिकारा'चा ट्रेलर रिलीज


मालदीवला जाऊन 'जलपरी' बनली सारा अली खान; व्हिडीओ केला इन्स्टाग्रामवर पोस्ट