स्कोर ट्रेंड्स इंडियाने दिलेल्या यादीत 100 अंकांसह दिशा पटानी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. 98 अंकासह प्रियंका चोप्रा जोनास दुसऱ्या स्थानावर आहे. तर, सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण 84 अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने प्रमाणीत केली आहे.
दिशा पटानी युवक वर्गात चर्चेत -
दिशा पटानीची सर्वाधिक चर्चा ही युवकवर्गात आहे. तिच्या कोणत्याही पोस्टवर तरुणवर्ग तुटून पडतो. तिच्या पोस्टवरच्या रिअॅक्शन बघता आगामी काळात दिशाची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती स्कोर ट्रेंड्सच्या अधिकाऱ्याने दिली आहे. प्रियंका चोप्राच्या ट्विटरवर ग्लोबल इंटरेक्शन वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जेएनयू प्रकरणामुळ दीपिका पादुकोणही ट्विटरवर चर्चेत आहे.
फोलोवर्सच्या संख्येत दीपिकाच नंबरवन -
सध्याची आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण गाजत आहे. तिचा छपाक हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात आहे. दीपिकाने मागील काही वर्षांत एकामागून एक हिट चित्रपट दिलेत. त्यामुळे तिच्या फोलोवर्सची संख्याही खूप वाढली आहे. दीपिका पादुकोणला ट्विटरवर 26.8 मिलीयन फोलोवर्स आहेत. दुसरीकडे अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या चाहत्यांची संख्याही दीपिकाच्या खालोखाल आहे. प्रियंका चोप्रा हिला ट्विटरवर 25.6 मिलीयन इतके फोलोवर्स आहेत. प्रियंकाने बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. हॉलीवूडमध्येही प्रियंकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दिशा पटानी जरी सध्या ट्विटरवर जास्त चर्चेत असली तरी तिच्या फोलोवर्सची संख्या दीपिका आणि प्रियंका यांच्या तुलनेत फारच कमी आहे. दिशा पटानी हिला ट्विटरवर फक्त 4 मिलीयन इतके फोलोवर्स आहेत. दिशा पटानीचा आगामी मलंग हा चित्रपट सात फेब्रुवारीला प्रदर्षित होणार आहे.
संबंधिता बातम्या -
- बॉलिवूड सेलिब्रिटीमुळे तुमच्या प्रचाराला 'दिशा' मिळेल? आदित्य ठाकरे म्हणाले...
- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचं ब्रेकअप
- आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनर डेटबाबत दिशा पाटनी म्हणते...
Dipika Padukon | अभिनेत्री दीपिका पादुकोण सिध्दिविनायक मंदिरात, बाप्पाच्या चरणी लीन | ABP Majha