साराने आपल्या व्हेकेशन व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. साराने 'जल परी, मै चली.' असं कॅप्शन देत तिनं इमोजी देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सारा समुद्रात पोहोताना दिसत आहे.
या व्हिडीओआधी सारा अली खानने आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती निळ्याशार समुद्रामध्ये एन्जॉय करताना दिसत होती. तसेच साराने आपल्या न्यू ईयर व्हेकेशनचे फोटोही शेअर केले होते. तसेच साराचे बिकनी लूकमधील फोटो इंटरनेटवर व्हायरल होत होते.
खास गोष्ट म्हणजे, साराच्या या न्यू ईयर ट्रिपवर तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंहदेखील होते. साराने आपली आई आणि भावासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
साराच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर ती 'लव आज कल' आणि 'कुली नंबर 1'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. 'लव आज कल'च्या सीक्वलमध्ये सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसून येणार आहे. तर 'कुली नंबर 1'मध्ये वरुण धवनसोबत दिसून येणार आहे.
दरम्यान, सारा अली खान इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह असून 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत आगामी चित्रपट 'आज कल' मध्ये दिसून येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी म्हणजेच, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या :
सारा अली खानने अभिनेत्री रेखाबाबत लिहिली अशी गोष्ट; सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट
JNU Attack | जेएनयू हल्ल्याचा रितेश, स्वरा, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध
#JNUVioence : देशातील विद्यार्थ्यांपेक्षा गायी जास्त सुरक्षित : ट्विंकल खन्ना
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज; विंग कमांडरच्या भूमिकेत दिसणार अजय देवगन