Shikara Trailer : दिग्दर्शक विधु विनोद चोप्राचा आगामी चित्रपट 'शिकारा-अ लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या नावावरून हे स्पष्ट होतं की, या चित्रपटाचं कथानक काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. या चित्रपटाची प्रेक्षक फार आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेलरचीच चर्चा होताना दिसत आहे.


चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये म्यूजिशियन ए.आर. रहमान देखील उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलरबाबत बोलायचे झाले तर एक जोडपं आनंदात बसलेलं असतानाच अचानक घराबाहेर गोंधळ सुरू होतो. एक घर पेटवलेलं दिसतं. सर्व लोक घाबरून घरातून रस्त्यावर येतात. तुम्ही पाहू शकता की, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या घरांमध्ये आग लावण्यात येत असून काही लोक काश्मिरी पंडितांना काश्मिर सोडून जाण्यास सांगत आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, अशा घोषणा ऐकून काश्मिरी पंडित घाबरून जातात.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की, या चित्रपटाचं कथानक 1947मध्ये झालेल्या फाळणीनंतर काश्मिरी पंडितांच्या आजूबाजूला फिरतं. सिनेमाची कथा 1990 साली जेव्हा काश्मीरमधून एक समुदायला बेघर करण्यात आले होते. 30 वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा अजून ते आपल्या घरी परतले नाहीत. त्यांची व्यथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे. विधु विनोद चोप्रा यांची शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित' 7 फेब्रुवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे.

दरम्यान, ट्रेलर लॉन्च करण्यापूर्वी या चित्रपटाचे अनेक ट्रेल प्रदर्शित करण्यात आले आहेत. आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अधिकाधिक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. हे मोशन पोस्टर इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालं होतं.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर :



संबंधित बातम्या : 

मालदीवला जाऊन 'जलपरी' बनली सारा अली खान; व्हिडीओ केला इन्स्टाग्रामवर पोस्ट

अभिनेता अक्षय कुमार निरमा पावडरच्या जाहीरातीमुळे वादात, शिवप्रेमींचा संताप, माफीची मागणी

#JNUVioence : देशातील विद्यार्थ्यांपेक्षा गायी जास्त सुरक्षित : ट्विंकल खन्ना

JNU Attack | जेएनयू हल्ल्याचा रितेश, स्वरा, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध