Tunisha Sharma: 'ती आत्महत्या करुच शकत नाही'; तुनिषा शर्माच्या मामानं व्यक्त केल्या भावना
पोलिसांनी तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मामाचा जबाब नोंदवला आहे. तुनिषाचा मामा पवन शर्मानं नुकतीत एबीपी न्यूजला मुलाखत दिली.

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा 'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तुनिषानं 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता शिझान खानवर (Zeeshan Khan) लावण्यात आला होता. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी तुनिषाच्या कुटुंबियांचा जबाब पोलीस नोंदवत आहेत. पोलिसांनी तुनिषा शर्माच्या मामाचा जबाब नोंदवला आहे. तुनिषाचा मामा पवन शर्मानं नुकतीत एबीपी न्यूजला मुलाखत दिली. 'तुनिषा आत्महत्या करुच शकत नाही', असं या मुलाखतीमध्ये त्यांनं सांगितलं.
पोलिसांनी तुनिषा शर्माच्या मामाचा जबाब नोंदवला आहे. एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुनिषाच्या मामानं सांगितलं, 'तुनिषानं मृत्यूच्या आधी एक मोटिवेशनल पोस्ट केली होती. त्यामध्ये तिनं करिअर, पॅशन याबाबत लिहिलं होतं. ती आत्महत्या करुच शकत नाही. तिची हत्या झाली आहे. करिअरमध्ये ती पुढे जात होती. त्यामुळे ती आत्महत्या करुच शकत नाही.'
'पोलिसांनी हत्येच्या अँगलनं तपास करावा' तुनिषा शर्माच्या मामानं केली मागणी
'पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्याच्या अँगलनं करावा. तसेच पोलीस आणि सरकारनं आम्हाला सपोर्ट करावा. गेल्या काही महिन्यांपासून तुनिषाच्या वागण्यामध्ये देखील काही बदल झाले होते. पोलिसांनी त्याबाबत देखील तपास करावा.' असंही तुनिषाच्या मामानं सांगितलं.
तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती. आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळेच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला, असं म्हटलं जात आहे. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) आणि 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. तुनिषा सोशल मीडियावर देखील सक्रिय होती. ती विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
