एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘ट्यूबलाईट’च्या शूटिंगला अखेर मुहूर्त मिळाला!

मुंबई : कबीर खान आणि सलमान खान यांची जोडी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंग भाईजान’नंतर ‘ट्यूबलाईट’ सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 जुलैपासून लडाखमध्ये सलमान खान या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे.
https://twitter.com/kabirkhankk/status/757433705426137089
जोधपूर कोर्टाकडून सलमान खानला काळवीट प्रकराणी मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर ट्यूबलाईट सिनेमाच्या शूटिंगतं वेळापत्रकही कबीर खानने तयार केलं आहे. खरंतर कबीर खान अनेक दिवसांपासून शूटिंगची तयारी करत होता. मात्र, जोधपूर कोर्टाच्या निर्णयाचीच तोही वाट पाहत होता.
28 जुलैपासून सुरु होणाऱ्या शूटिंगमध्ये सलमानचा भाऊ सोहेल खान सहभागी होणार आहे. सलमान खान तीन-चार दिवसांनंतर लडाखमध्ये पोहोचणार आहे. बजरंगी भाईजान सिनेमानंतर दुसऱ्यांदा कबीर आणि सलमान काश्मीरच्या स्वर्गीय सौंदर्यात शूटिंग करणार होते. मात्र, काश्मीर अशांत असल्याने ही शूटिंग लडाखमध्ये होणार आहे.
https://twitter.com/kabirkhankk/status/758301206208843777
क्रॉस-बॉर्डर लव्ह स्टोरीवर आधारित ट्यूबलाईट सिनेमा आहे. भारतीय तरुणाचे चीनमधील तरुणीशी प्रेमसंबंध जुळतात. शिवाय, 1960-62 च्या इंडो-चीन युद्धाचीही पार्श्वभूमी या सिनेमाला देण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
