TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन विषयांवरील मालिकांचे प्रयोग होत आहेत. आता 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शाहरुख खानच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा
आज जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान आणि त्याचा धाकटा मुलगा अबरामने मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाचे शाहरुखचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वप्नील जोशीच्या 'बळी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; हॉरर
'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ
आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान
अभिनेता, निर्माता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता मंगेश देसाई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. कर्जतला जात असताना मंगेशच्या कारला अपघात झाला आहे.
नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!
साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या आगामी चित्रपट 'द घोस्ट'चा टीझर रिलीज झाला आहे. 'द घोस्ट'च्या टीझरमध्ये अभिनेता नागार्जुन एका खतरनाक अवतारात दिसत आहे. या चित्रपटात नागार्जुनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. यासोबतच निर्मात्यांनी नागार्जुनचा या चित्रपटातील लूकही शेअर केला आहे. नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळतो. रितेशनं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. लय भारी, माऊली या रितेशच्या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेशनं दिग्दर्शित केलेला वेड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करुन रितेशनं या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
धर्मा आणि चार्लीची जोडी आता ओटीटीवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस
सध्या दाक्षिणात्य चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पुष्पा आणि आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. '777 चार्ली' हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानक आणि कलाकांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'डान्स दीवाने ज्यूनियर'च्या महाअंतिम सोहळ्यात नीतू आणि रणबीरचा डान्स; 'शमशेरा'च्या टीमची हजेरी
'डान्स दीवाने ज्यूनियर' हा कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 'डान्स दीवाने ज्यूनियर' या कार्यक्रमात नीतू कपूर, नोरा फतेही आणि मर्जी पेस्तोनजी परीक्षकाच्या भूमिकेत होते. 'डान्स दीवाने ज्यूनियर'च्या महाअंतिम सोहळ्यात नीतू कपूर आणि रणबीर कपूरचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रार्थना बेहरेच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो प्रार्थना शेअर करतो. प्रार्थना ही 'पेट लव्हर' आहे. प्रार्थनाकडे गब्बर आणि फिल्मी नावाची दोन कुत्री आहेत. गब्बर आणि फिल्मीसोबतचे फोटो प्रार्थना सोशल मीडियावर शेअर करते. आता प्रार्थनाच्या घरी नव्या पाहूण्याची एन्ट्री झाली आहे. या पाहुण्याचं नाव मूव्ही असं आहे. मूव्हीसोबतचा एक खास व्हिडीओ प्रार्थनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.