TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार!
‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला आर्थिक मदत त्यांनी केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्याद्वारे विठुरायाला भावनिक साद
दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला पायी वारी करत निघाले आहेत. डोळ्यांचं पारणं फिटवणारा हा रम्य सोहळा संगीतकार व गायक श्रीजीत गायकवाड 'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्यामार्फत मांडणार आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधत हे गाणं त्याने नुकतचं प्रदर्शित केलं आहे. शिवाय हे गाणं त्याने स्वत: गायले असून, संगीतसुद्धा त्यानेच केले आहे. या गाण्याला गणपत कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केले असून, गाण्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
'मला पांडुरंग असा भेटला', अभिनेता स्वप्नील जोशीची पंढरपूर पायी वारी!
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी ए्कादशीचा माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. ‘वारीचा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच.. तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत!’, असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही, अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला.
'तारक मेहता' मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी; निर्मात्यांना मिळाली नवी दयाबेन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिनवसांपासून हा शो चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दिशा वकानीनंदेखील ही मालिका सोडली. दिशा या मालिकेमध्ये दयाबेन ही भूमिका साकारत होती. आता दयाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता लवकरच दिशा वकानी यांना एक अभिनेत्री रिप्लेस करणार आहे.
'कॉफी विथ करण 7'चा असाही विक्रम; पहिल्याच भागाला मिळाले सर्वाधिक व्ह्यूज
सिने-निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सहा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सातव्या सीझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या भागाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.
आमिर-करीनाचा 'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.
आलिया भट्टने लंडनमध्ये पूर्ण केलं 'हार्ट ऑफ स्टोन'चं शूटिंग
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच आलियाने या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
दिवंगत संजीव कुमार यांची बायोग्राफी प्रेक्षकांच्या भेटीला; अनिल कपूरच्या हस्ते प्रकाशन
अभिनेते संजीव कुमार यांची गनणा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये केली जाते. संजीव कुमार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'द अॅक्टर वी ऑल लव्हड' या बायोग्राफीचा आज मुंबईत प्रकाशन सोहळा पार पडला आहे. अनिल कपूरने या पुस्तकाचे प्रकाशन केले.
'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन होण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर पडत असते. या कार्यक्रमाचे तेरा पर्व चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. आता 8 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
सनी देओलचा 'चुप' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओल 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर बाल्किने सांभाळली आहे.