एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

काली पोस्टर वादावर ट्वीटरने उचललं मोठं पाऊल; लीना मणिमेकलाईची वादग्रस्त पोस्ट हटवली

सिने निर्मात्या लीना मणिमेकलाई यांचा 'काली' हा माहितीपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतो आहे.  या माहितीपटाच्या पोस्टरमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. नेटकरी या माहितीपटाच्या माध्यमातून 'काली'च्या पोस्टरला विरोध करत आहेत. आता ट्विटरनेदेखील 'काली' पोस्टर वादावर मोठं पाऊल उचललं आहे. 

'तू सहानभूती मिळवत आहेस'; कॅन्सरमुक्त झालेल्या छवी मित्तलचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री छवी मित्तल ही तिच्या कॅन्सर लढ्यामुळे चर्चेत आहे.  छवी मित्तलवर 25 एप्रिल रोजी ब्रेस्ट कॅन्सरची अर्थात स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर छवी कॅन्सरमुक्त झाली आहे. छवी सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन लोकांना तिच्या कॅन्सर लढ्याबाबत माहिती देत आहे. पण एका नेटकऱ्यानं छवीला ट्रोल केलं आहे. या ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन छवीनं ट्रोलर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अशी निरागस होती ऐश्वर्या; पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची गणना जगातील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत होते. ऐश्वर्या रायची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. सध्या ऐश्वर्याचा पासपोर्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रामगोपाल वर्मांचा 'लडकी : ड्रॅगन गर्ल' चीनमध्ये होणार प्रदर्शित; 15 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. 'लडकी : ड्रॅगन गर्ल' हा त्यांचा आगामी सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा मार्शल आर्ट्सवर आधारित आहे. हा सिनेमा देशभरात हिंदीसह पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच चीनमध्येदेखील हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. 

‘लायगर’चे नवे पोस्टर आऊट; 25 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज

 करण जोहरचा 'लायगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

'माझा विठ्ठल माझी वारी'; माऊलींच्या जयघोषात चिंब झाला संदीप पाठक

एबीपी माझाचा 'माझा विठ्ठल माझी वारी' हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाची धुरा अभिनेता संदीप पाठक सांभाळत आहे. सिनेमा, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला अभिनेता संदीप पाठक सध्या माऊलीच्या जयघोषात ब्रम्हरसात न्हाऊन गेला आहे.

'तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..!; 'विठ्ठला तूच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेंचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मुरांबा मालिकेत बरसणार प्रेमाचा पाऊस; रमा आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

मुरांबा मालिकेत प्रेमाचा पाऊस बरसणार आहे. रमा आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

शाहरुखच्या जवानमध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री; या साऊथ अभिनेत्याला केलं रिप्लेस

बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुख हा चार वर्षानंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. लवकरच त्याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवान या चित्रपटाचा टीझर हा 3 एप्रिल रोजी रिलीज झाला. टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता जवान चित्रपटामध्ये शाहरुखसोबत साऊथचे काही प्रसिद्ध अभिनेते काम करणार आहेत. एका साऊथ स्टारनं दुसऱ्या साऊथ स्टारला या चित्रपटात रिप्लेस केलं आहे.

'777 चार्ली'ने 25 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई; रक्षित करणार सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत

'777 चार्ली' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 20 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांत 80.48 कोटींची कमाई केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का द्यायचा प्लॅन बारगळला, विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावण्याचा प्रयत्न
भाजपने अजित पवारांच्या विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावायला डाव टाकला, पिंपरी चिंचवडमध्ये दोस्तीत कुस्ती
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
Embed widget