टीआरपीत स्टार प्रवाहची बाजी! झी मराठी दुसऱ्या तर कलर्स मराठी तिसऱ्या स्थानी
महाराष्ट्रात झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह या वाहिन्यांचा समावेश होतो. या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच स्पर्धा असते. पण आता एक चकित करणारा निकाल यावेळी बार्क अर्थात बीएआरसीने दिला आहे.
छोटा पडदा हे माध्यम आता घरोघरी पोचलं आहे. अनेक मालिका अनेक रिएलिटी शोज यांमधून हा पडदा सर्वांचं मनोरंजन करत असतो. महाराष्ट्रात मालिका दाखवणाऱ्या मोजक्या वाहिन्या आहेत. यात झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह या वाहिन्यांचा समावेश होतो. या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच स्पर्धा असते. पण आता एक चकित करणारा निकाल यावेळी बार्क अर्थात बीएआरसीने दिला आहे.
आजवर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी वाहिनी म्हणून झी मराठीचा वारंवार उल्लेख व्हायचा. कारण या वाहिनेने अत्यंत कष्टपूर्वक राज्यातल्या प्रेक्षकांची नस ओळखून मालिका दिल्या. महाराष्ट्रातली अव्वल वाहिनी म्हणून झी मराठीचं अढळ स्थान अनेक वर्षं होतं. त्यानंतर कलर्स मराठीचा नंबर होता तर या तुलनेत स्टार प्रवाह फारच खाली होतं. स्टार प्रवााहनेही यापूर्वी अनेक चांगल्या मालिका दिल्या आहेत. पण कालांतराने ही वाहिनी मागे पडली. त्याला इतर अनेक कारणेही होती. कलर्स मराठी मात्र दुसऱ्या स्थानी होती. तरीही झी मराठी आणि कलर्स मराठी यांच्या आकड्यात खूपच मोठा गॅप होता. पण लॉकडाऊननंतर रिबूट मोडला गेलेल्या सर्व वाहिन्यांनी पुन्हा एकदा मालिकांचा खेळ मांडला. काहींनी नव्या मालिका आणल्या काहींनी कथानकं बदलली. काहींनी आधीचे ट्रॅक पुढे चालू ठेवले. पण अनेक संक्रमणातून मालिका गेल्या. या सगळ्याला कोव्हिडची भीती होतीच.
लॉकडाऊननंतर नव्याने सुरू झालेल्या मालिकांमध्ये मात्र स्टार प्रवाहने मुसंडी मारली. अनेक नव्या मालिका ही वाहिनी घेऊन आली. या काळात आई कुठे काय करते, मोलकरीण बाई, रंग माझा वेगळा या मालिका लोकांना आवडू लागल्या. याचा थेट फायदा स्टार प्रवाहला होऊ लागला. आता त्याचे निकाल हाती आले आहेत. 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या आठवड्यात आलेल्या टीआरपीच्या आकड्यानुसार स्टार प्रवाहने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचे आकडे आहेत 292491. तर दुसऱ्या स्थानवार आहे झी मराठी. त्यांचं रेटिंग आहे 278321. आणि कलर्स मराठी आता तिसऱ्या स्थानी गेलं आहे त्यांचं रेटिंग 131405 असं आहे. त्यापुढे झी टॉकिज आणि त्यानंतर फक्त मराठी यांचा नंबर लागतो.
कंगनाचा पुनश्च हरिओम, थलैवीच्या चित्रिकरणासाठी दक्षिणेत रवाना
बऱ्याच वर्षांनी हा बदल टीआरपी रेटिंगमध्ये झाला आहे. अर्थात मालिकांचे ट्रॅक जसे बदलतात तसे दरवेळी हे आकडे खालीवर होत असतात. पुढच्या आठवड्यात कदाचित झी मराठी पुन्हा वर येऊ शकतं. पण हे असं चालूच राहतं. पण तरीही एरवी कुणाचाही अडसर कधीच न आलेल्या झी मराठीला मात्र लॉकडाऊन नंतरच्या काळात नव्याने आपले आडाखे बांधावे लागतील असं दिसतंय. कलर्स मराठीही आता कंबर कसेल यात शंका नाही. तर स्टार प्रवाहही आपला क्रमांक एक टिकवायला जीवाचं रान करेल. याचा थेट फायदा प्रेक्षकांना होणार आहे. त्यांना यातून चांगलं काही पाहायला मिळेल हे नक्की आहे.
मलिकेत रंग माझा वेगळा अव्वल टीव्ही मालिकांचा जसा क्रमांक टीआरपीवर ठरतो तसा रोज आपल्या भेटीला येणाऱ्या मालिकांचाही टीआरपी असतो. याच आठवड्यात म्हणजे 19 ते 25 सप्टेबर या आठवड्यात रंग माझा वेगळा ही स्टार प्रवाहची मालिका अव्वल आली आहे. तर त्याच्या खालोखाल सहकुटुंब सहपरिवार ही मालिका दुसऱ्या स्थानी गेली आहे. तिसऱ्या स्थानी झी मराठीची माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे. तर त्यानंतर स्टार प्रवाहची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर माझा होशील ना ही मालिका आहे. या सगळ्यातून राणादा आणि अंजलीबाईंचा तुझ्यात जीव रंगला मात्र गायब झाली आहे. उद्या अनेक वेगवेगळे ट्रॅक आले तर यातूनच ही आकडेवारी खाली वरही होऊ शकेल.
Web Exclusive | सिंगिंग स्टार अजय पुरकर 'माझा'वर; अभिनय ते सिंगिंग स्टार पर्यंतचा प्रवास..