एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार जाहीर 

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार   सोहळ्याचे रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला  आशा पारेख, लारा दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, अहान शेट्टी, सान्या मल्होत्रा आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तसेच अभिनेत्री क्रिती सेननला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंहला देखील  83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट

बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 11 मार्चला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

'मी वसंतराव' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला 

माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास 'मी वसंतराव' या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. आज जगप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर सादर झाली आहे. आज (21 फेब्रुवारी) उस्ताद झाकीर हुसेन यांनी या सिनेमाचा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'थार'मध्ये अनिल कपूरसोबत दिसणार हर्षवर्धन कपूर

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांच्या आगामी 'थार' सिनेमाची घोषणा केली आहे. 'थार' सिनेमाची घोषणा करत त्यांनी सिनेमातील कलाकारांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत अनिल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरदेखील दिसतो आहे. त्यामुळेच 'थार' सिनेमात अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. तिच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाला बंपर यश मिळाले आहे. रश्मिका मंदना ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जाते. आता अशी चर्चा आहे की, रश्मिका लवकरच लग्न करणार आहे. रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा यांची जोडी सर्वांनाच आवडते. नुकतेच दोघेही मुंबईत एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या वर्षी दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, रश्मिका किंवा विजय या दोघांनीही याबाबत खुलासा केलेला नाही.

संबंधित बातम्या

Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित

Babu : बाबू नाय...बाबू शेठ! अंकित मोहनचा अॅक्शनपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Farhan-Shibani Post Marriage : फरहान-शिबानीने लग्नानंतर पापाराझींना दिली मिठाईची भेट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget