एक्स्प्लोर

हृतिकने दिशासोबत फ्लर्ट केल्याची चर्चा, टायगर म्हणतो...

आता हृतिकला आदर्श आणि सल्लागार मानणाऱ्या टायगर श्रॉफनेही या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे.

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने टायगर श्रॉफची गर्लफ्रेण्ड दिशा पटानीसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती. ही बाब मीडियामध्ये आल्यानंतर हृतिकचा पारा चढला आणि त्याने हे वृत्त छापणाऱ्या वेबसाईटवर तोंडसुख घेतलं. तर दिशा पटानीनेही हे वृत्त फेटाळत हृतिक चांगल्या मनाचा माणून असल्याचं सांगत त्याला क्लीन चिट दिली. तसंच आपण त्याची मोठी चाहती असल्याचंही सांगितलं. दिशा पटानी लवकरच हृतिक रोशनसोबत नव्या सिनेमात दिसणार आहे. आता हृतिकला आदर्श आणि सल्लागार मानणाऱ्या टायगर श्रॉफनेही या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. मुंबईत एका उत्पादनाच्या लॉन्च सोहळ्यात टायगरने या संपूर्ण चर्चेवर भाष्य केलं. हृतिक आणि दिशाच्या कथित अफेअरप्रकरणी एबीपी न्यूजने विचारलेल्या प्रश्नावर टायगर म्हणाला की, "हे या इंडस्ट्रीचा पार्ट अँड पार्सल आहे. ही केवळ हृतिकची गोष्ट नाही. प्रत्येक कलाकाराला अशाप्रकारच्या घटनांमधून जावं लागतं. जेव्हा तुम्ही लाईमलाईटमध्ये असता, तेव्हा सगळ्यांसाठी तुम्ही एक सोपं लक्ष्य बनता." मात्र ही अतिशय बालिश अफवा होती. मी दोघांना (हृतिक आणि दिशा) चांगल्याप्रकारे ओळखतो. अशी कोणतीही गोष्ट नव्हती. दोघे अतिशय चांगली माणसं आहेत, असंही टायगरने सांगितलं. टायगरने 'स्टूडंट ऑफ द इअर 2' साठी नो 'किसिंग क्लॉज' साईन केल्याचं वृत्त फेटाळत ही अफवा असल्याचं सांगितलं. टायगर म्हणाला की, "माझ्या प्रत्येक सिनेमात किसिंग सीन्स आहेत आणि अभिनेता म्हणून सगळ्यांना सीनच्या मागणीनुसार काम करावं लागतं." टायगर श्रॉफ यशराजच्या आगामी सिनेमात हृतिक रोशनसोबत काम करणार आहे. यावर टायगर म्हणाला की, "माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. मी हृतिकचा एक अभिनेता, एक माणूस म्हणून मी त्याचा खूप आदर करतो. ती त्याचा मोठा चाहता आहे. त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल. आम्ही ऑक्टोबरपासून चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे मी फारच उत्सुक आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget