एक्स्प्लोर
Advertisement
'ठग्ज..'चा पहिल्या दिवशी विक्रम, दुसऱ्या दिवशी उतरती कळा
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला दुसऱ्या दिवशी केवळ 28.25 कोटी रुपयेच कमावता आले. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन्ही दिवस मिळून 'ठग्ज'ने 81.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
मुंबई : आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिनेमाला उतरती कळा लागली आहे. दुसऱ्या दिवशाची कमाई जवळपास निम्म्यावर आली आहे.
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पहिल्या दिवशी (गुरुवार 8 नोव्हेंबर) हिंदी भाषेत 50.75 कोटी कमावले, तर तामिळ-तेलुगू मिळून अडीच कोटींची कमाई केली. अशाप्रकारे पहिल्या दिवसात एकूण 52.25 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. शुक्रवारी मात्र 'ठग्ज..'ला केवळ 28.25 कोटी रुपयेच कमावता आले. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन्ही दिवस मिळून 'ठग्ज'ने 81.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' देशभरात पाच हजार स्क्रीन्सवर झळकला. पहिल्या दिवसाची कमाई पाहून हा सिनेमा दुसऱ्याच दिवशी शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असे ठोकताळे बांधले जात होते. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे 'ठग्ज'च्या कलेक्शनमध्ये घसरण झाल्याचं चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. भाऊबीजेमुळे या प्रेक्षक सिनेमागृहात गेले नसतील, मात्र ही तूट शनिवार-रविवारी भरुन निघेल, असं म्हटलं जात आहे. मात्र समीक्षकांचे वाईट रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या निगेटिव्ह माऊथ पब्लिसिटीचा फटका सिनेमाला बसल्याचा अंदाज आहे.#ThugsOfHindostan HINDI: Thu 50.75 cr, Fri 28.25 cr. Total: ₹ 79 cr TAMIL + TELUGU: Thu 1.50 cr, Fri 1 cr. Total: ₹ 2.50 cr Total: ₹ 81.50 cr [5000 screens] India biz.#TOH
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2018
खुद्द तरण आदर्श यांनीही दोन स्टार देत सिनेमा निराशाजनक असल्याचं सांगितलं होतं. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी (शनिवार-रविवार) सिनेमाने चांगली कामगिरी केली नाही, तर सोमवारपासून 'ठग्ज..'चं भवितव्य अंधारात असल्याचं भाकितही तरण आदर्श यांनी वर्तवलं.And the DECLINE begins... #ThugsOfHindostan slips on Day 2, facing a fall during #Diwali holidays... Mass belt / single screens are holding better, but the cracks are already showing at plexes... Day 3 [Sat] and Day 4 [Sun] are extremely crucial... #TOH
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2018
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा 'ठग्ज...' हा बाहुबलीनंतरचा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवलेला हा सिनेमा आहे. दुसरीकडे मराठी प्रेक्षकांनी आपला मोर्चा 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाकडे वळवला आहे. त्यामुळे 'काशिनाथ' चांगली कमाई करेल, अशी आशा आहे.#ThugsOfHindostan has to show a positive upturn on Day 3 [today], else its sustainability from Day 5 [Mon] onwards will be extremely doubtful... One thing is crystal clear: #TOH has NOT met the monumental expectations... The BO numbers are doing the talking now.
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement