![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज!
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुन लग्नबंधनात अडकणार आहेत.
![Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज! Tharla Tar Mag If it is decided then Sayli will do a contract marriage with Arjun to prove Madhubhau innocence Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/05/154ce88eb3406464857a628f105996e11675590934782254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून सायली ज्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडतेय तो निर्णायक क्षण मालिकेत आला आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या सायलीला मधुभाऊंनी वडिलांच्या मायेने वाढवलं. मात्र अनाथ आश्रमाची जागा बळकावण्यासाठी त्यांना न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु आहेत.
मधुभाऊंच्या बाजूने कोर्टात लढण्यासाठी अर्जुनने कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचा पर्याय सायलीसमोर ठेवला आहे. या लग्नासाठी सायली मनापासून तयार नाही. मात्र परिस्थितीसमोर हतबल होत तिने अर्जुनने दिलेला पर्याय स्वीकारण्याचं ठरवलं आहे. अर्जुन आणि सायली विवाहबंधनात अडकणार आहेत. कॉण्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी मंदिरात देवाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने दोघांचीही लगीनगाठ बांधली गेली आहे.
View this post on Instagram
लग्नानंतर सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. मालिकेतलं हे वळण नक्कीच उत्कंठावर्धक असेल. ही मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाहवर पाहू शकतात. सध्या या मालिकेची मालिकाप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
'पुढचं पाऊल' या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी घराघरांत पोहोचली आहे. त्यानंतर 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून जुई प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जुईची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर आता 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून जुईने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं आहे. जुई साकारत असेली सायलीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माते मालिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. या मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. आता 'ठरलं तर मग' ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
ठरलं तर मग
किती वाजता? रात्री 8.30
कुठे? सोमवार ते शनिवार
संबंधित बातम्या
Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक; ‘ठरलं तर मग’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)