Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर ; डॉक्टर म्हणाले...
Sayaji Shinde : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nora Fatehi : नोरा फतेहीने केली इंडस्ट्रीची पोलखोल! बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधत केला गौप्यस्फोट
Nora Fatehi On Bollywood Couples : आपल्या दिलखेच अदा, नृत्य आणि सौंदर्याने नोरा फतेहीने (Nora Fatehi) बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. तिचा आता एक चाहता वर्गदेखील तयार झाला आहे. नोराने सिनेइंडस्ट्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. तिने बॉलिवूडमधील (Bollywood) कपल्सवर निशाणा साधला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gandhi Web Series : रिअल लाईफ कपल साकारणार महात्मा गांधी-कस्तुरबांची भूमिका; 'गांधी' वेब सीरिज लवकरच भेटीला
Gandhi Web Series : वेगळ्या विषयांची हाताळणी करणारे दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या आयुष्यावर आधारीत वेब सीरिज (Web Series) लाँच करत आहेत. या वेबसीरीजचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे. महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी (Kasturba Gandhi) यांचा जीवनपट उलगडण्यात येणार आहे. गांधी या वेबसीरिजमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भूमिका सेलिब्रेटी कपल्स साकारणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Actor Accident : धक्कादायक! साखरपुड्याच्या दिवशीच लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू
Actor Dies on Car Accident : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ येथील लोकप्रिय अभिनेता सूरज मेहर (Suraj Meher) याचं निधन झालं आहे. नारद मेहर नावाने सूरज लोकप्रिय होता. 'आखिरी फैसला' (Aakhri Faisla) या चित्रपटाचं तो शूटिंग करत होता. बुधवारी शूटिंग संपवून घरी परतत असताना रस्ते अपघातात त्याचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी अभिनेत्याचा साखरपुडा होता त्याच दिवशी त्याचे निधन झाले आहे. सूरज मेहर अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून झळकला आहे. छत्तीगढमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सूरज दिसून येतो. शूटिंगमधून परतत असताना अभिनेत्याच्या स्कॉर्पियोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. छत्तीगढमधील पिपरडुला गावातील ही घटना आहे. 9-10 एप्रिलच्या मध्यरात्री सूरजचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pushpa 2 The Rule : अर्धनारी अवतार, डोळ्यांत अंगार; सहा मिनिटांच्या 'त्या' सीनसाठी 60 कोटींचा खर्च, 'पुष्पा 2' टीझरमधील पौराणिक गोष्ट काय?
Pushpa 2 Teaser Allu Arjun Gangamma Jatara : अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 : द रुल' (Pushpa 2) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला. जवळपास 68 सेकंदाच्या टीझरमध्ये फक्त एकच सिक्वेन्स दिसला होता. यामध्ये अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा गेटअप, लूक इतका पॉवरफूल होता की 'पुष्पा 2'चा टीझर अनेकांनी पाहिला. अल्लू अर्जुनच्या लूकवर अनेकांना प्रश्न पडले होते. टीझरमधील अल्लूचा हा लूक धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे. तिरुपती गंगम्मा जत्रेशी संबंधित हा उत्सव आहे. या जत्रेच्या मागे महिलांच्या मान-सन्मानाशी निगडीत एक पुराणकथा आहे.