Gandhi Web Series :  वेगळ्या विषयांची हाताळणी करणारे दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या आयुष्यावर आधारीत वेब सीरिज (Web Series) लाँच करत आहेत. या वेबसीरीजचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे. महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी (Kasturba Gandhi) यांचा जीवनपट उलगडण्यात येणार आहे. गांधी या वेबसीरिजमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची भूमिका सेलिब्रेटी कपल्स साकारणार आहे. 


कोण साकारणार भूमिका?


गांधी या वेब सीरिजमध्ये अभिनेता प्रतिक गांधी हा महात्मा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर, गुरुवारी 11 एप्रिल रोजी कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री भामिनी ओझा हीचे नाव जाहीर करण्यात आले. 


कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ॲप्लॉज एंटरटेनमेंटच्या मालिकेची घोषणा करण्यात आली. प्रतिक गांधी आणि भामिनी यांनी 2008 मध्ये विवाह केला होता. कस्तुरबा गांधीची भूमिका साकारणे हे माझ्या  अभिनयाच्या प्रवासातील सर्वात सुंदर क्षण असल्याची भावना भामिनीने व्यक्त केली. ही वेब सीरिज या जोडप्याची पहिली ऑन-स्क्रीन जोडी असणार आहे. 






भामिनीने काय म्हटले?


भामिनीने पुढे म्हटले की, “हंसल मेहता आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंट टीमसोबत काम करणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. आमच्या सुरुवातीच्या थिएटर दिवसांपासून, मी आणि प्रतिकने एकत्र स्क्रीन शेअर करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आता ते पूर्ण होत असल्याचे भामिनीने सांगितले. कस्तुरबा यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही तिने म्हटले. 


निर्माते-दिग्दर्शक हंसल मेहता यांनी म्हटले की,  भामिनी ओझा ही अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. रंगभूमीवर तिने आपला सर्वोत्तम अभिनय सादर केला आहे. कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी तीच योग्य होती. आपल्या भूमिकेतून ती कस्तुरबा यांच्या व्यक्तीरेखेला न्याय देईल असा विश्वासही मेहता यांनी व्यक्त केला. 


'गांधी' या वेब सीरिजचे चित्रीकरण सुरू असून येत्या काही महिन्यात या सीरिजचे चित्रीकरण संपणार असल्याची माहिती आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :