Actor Dies on Car Accident : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ येथील लोकप्रिय अभिनेता सूरज मेहर (Suraj Meher) याचं निधन झालं आहे. नारद मेहर नावाने सूरज लोकप्रिय होता. 'आखिरी फैसला' (Aakhri Faisla) या चित्रपटाचं तो शूटिंग करत होता. बुधवारी शूटिंग संपवून घरी परतत असताना रस्ते अपघातात त्याचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी अभिनेत्याचा साखरपुडा होता त्याच दिवशी त्याचे निधन झाले आहे. सूरज मेहर अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून झळकला आहे. छत्तीगढमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सूरज दिसून येतो. शूटिंगमधून परतत असताना अभिनेत्याच्या स्कॉर्पियोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. छत्तीगढमधील पिपरडुला गावातील ही घटना आहे. 9-10 एप्रिलच्या मध्यरात्री सूरजचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.


सूरज मेहर ग्राम सरिया बिलाईगढ भागात राहणारा आहे. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. सरसीवा पोलीस ठाण्यातील पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्कॉर्पियोमध्ये फसलेल्या बाकी लोकांना बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. 


साखरपुड्याच्या दिवशीच अभिनेत्याचं निधन


भीषण अपघातात सूरज मेहरचं निधन झालं असून ड्रायव्हरसह आणखी दोन लोक गंभीर आहेत. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूरज मेहरचा 10 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा होणार होता. ओडीसा येथील भटलीमध्ये त्यांचा साखरपुडा होणार होता. पण साखरपुडा होण्याआधी त्याच दिवशी अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सूरजच्या निधनानंतर छत्तीसगढ इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे. 






सूरज मेहरचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. 'तोर मया के चिन्हा' या चित्रपटाच्या माध्यमातून सूरज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. अनेक चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा असून त्याच्या निधनाने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सूरज मेहर कामाशी प्रचंड प्रामाणिक होता. शूटिंग संपवून सूरज मेहर घरी परतत होता. सरियाला पोहल्यानंतर तो साखरपुड्यासाठी जाणार होता. घरच्यांनी त्याच्या साखरपुड्याच्या संपूर्ण तयारी केली होती. पण अभिनेत्याच्या नशिबात मात्र वेगळंच लिहिलेलं होतं. 


सूरजच्या निधनानंतर छत्तीसगढ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सूरजला रक्त बंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता सूरजच्या निधनानंतर त्याच्या 'आखिरी फैसला' चित्रपटाचं शूटिंग कसं होणार? कोणता अभिनेता सूरजची जागा घेणार हे पाहावे लागेल. 


संबंधित बातम्या


OTT Release This Week : ओटीटीवर 'या' आठवड्यात रिलीज होणार बिग बजेट चित्रपट; ईदला तुम्ही कोणती फिल्म पाहणार?