Bollywood : बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम मिळवणं काहींसाठी सोपं आहे तर काहींसाठी मात्र हा संघर्षमय प्रवास आहे. आई-वडिलांपैकी कोणी एक जण मनोरंजनसृष्टीत सक्रीय असेल तर त्यांचा मुलाला बॉलिवूडमध्ये खूप सहज एन्ट्री मिळते, असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे या मुलांना नेपोटिज्म हा टॅग लावला जातो. आई-वडिलांमुळे या मुलांना त्यांच्यातलं खरं कौशल्य दाखवता येत नाही. आई-वडिलांप्रमाणे मुलांना स्वत:ला सिद्ध करता आलं नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. एकेकाळी बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मचा बोलबाला होता. त्यावेळी फोटोत दिसणारा हा मुलगा चाहत्यांचा विचार बदलण्यात यशस्वी ठरला. वडिलांच्या नावावर सिनेसृष्टीत पदार्पण केलं असलं करी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात हा अभिनेता यशस्वी ठरला. 


वडिलांचे नाव काढणारा अभिनेता


फोटोत दिसणारा लहान मुलगा हा बाबिल खान (Babil Khan) आहे. बाबिल खान आज इंडस्ट्रीतलं लोकप्रिय नाव आहे. बाबिलने आज इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं विश्व निर्माण केलं असलं तरी त्याचे वडील इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. बाबिल खान हा दिग्गज अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा आहे. इरफान खान यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. कौटुंबिक, विनोदी, नाट्यमय, थरार अशा कोणत्याही जॉनरचा चित्रपट असला तरी इरफान यांची एक वेगळी बाजू दिसून येते. इरफान खान यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. बाबिल खानने जेव्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा इतर स्टार किडप्रमाणे स्वत:ला सिद्ध करण्याचा त्याच्यावर दबाव होता. पण बाबिलने आलेल्या सर्व समस्यांचा सामना करत स्वत:ला सिद्ध केलं.


'या' चित्रपटांसाठी बाबिलचं झालं कौतुक


बाबिल खानने 'कला' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या कामाच्या माध्यमातून तो काहीतरी वेगळं काम करू इच्छितो हे त्याने दाखवून दिलं. त्यानंतर 'फ्रायडे नाइट प्लॅन' या सीरिजमध्येही त्याने कमाल काम केलं आहे. 'द रेल्वे मॅन' या चित्रपटात तो आर.माधवन, केके मेनन सारख्या कलाकारांसोबत दिसून आला होता. सर्वोत्कृष्ट मेल डेब्यू या कॅटेगरीत त्याला झी सिने अवॉर्ड आणि आयफा अवॉर्डदेखील मिळाला होता. 


बाबिल खानला आवडत नाही 'डेब्यू' शब्द


बाबिल खान 'कला' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान म्हणाला होता की,"मी इरफान खानचा मुलगा नसतो तर माझ्या डेब्यू चित्रपटाशी कोणाचा काहीही संबंध नसता. आजही मी ऑडिशन देत आहे. अनेक अडचणींवर मात करत आहे. तुमच्या कामाने लोक तुम्हाला ओळखतात ही मोठी गोष्ट आहे. मला वाटतं, डेब्यू आणि लॉन्चसारखे शब्द मला अजिबात आवडत नाहीत". 


संबंधित बातम्या


Babil Khan : इरफान खानचा मुलगा बाबिलनं 'आयफा 2023' पुरस्कारावर कोरलं नाव! अवॉर्ड स्विकारताना वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाला,"त्यांची आठवण..."