Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Bade Miyan Chhote Miyan Relase Date : अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ची रिलीज डेट जाहीर! 


Bade Miyan Chhote Miyan Release Date : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या ‘बडे मियां छोटे मियां’ची (Bade Miyan Chhote Miyan) घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता खिलाडी कुमारने एक फोटो शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट शेअर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Satyashodhak : ‘सत्यशोधक’ सिनेमा करमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


Satyashodhak : महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या आयुष्यावर आधारित ‘सत्यशोधक’ (Satyashodhak) हा सिनेमा आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. आता या सिनेमाच्या करसवलतीचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya : क्रिती आणि शाहिदचा रोमँटिक अंदाज; 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' 'या' दिवशी होणार रिलीज


Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटाच्या रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर क्रिती आणि शाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये क्रिती आणि शाहिद यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नेटकऱ्यांना मिळत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींना राजकारणात करायचं होतं करिअर; 'त्या' घटनेने बदलला निर्णय


Pankaj Tripathi on Politics : हिंदी मनोरंजनसृष्टीतील सदाबहार अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. सध्या ते 'मै अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. पण बॉलिवूडसह ओटीटी विश्व गाजवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना मात्र राजकारणात करिअर करायचं होतं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bigg Boss 17 : सलमान अन् तब्बूने सांगितला लग्नाचा प्लॅन; भाईजान म्हणाला, "व्हिलचेअरवर बसून घेणार सात फेरे"


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा वादग्रस्त कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच या कार्यक्रमाच्या मंचावर बॉलिवूडचा भाईजान सलमान आणि तब्बूने लग्नाचा प्लॅन रिवील केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा