Karmma Calling Trailer: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रवीनाचा चाहता वर्ग मोठा आहे. रवीनानं बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. आता रवीना ही ओटीटीवरुन पुनरागमन करणार आहे. रवीना लवकरच कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
रवीना साकारणार इंद्राणीची भूमिका
रवीना टंडनच्या कर्मा कॉलिंग या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात रवीनाच्या स्टेजरवरील एन्ट्रीने होते. यावेळी ती एका अत्यंत शक्तिशाली महिलेच्या अवतारात दिसत आहे. या सीरिजमध्ये रवीना ही इंद्राणीची भूमिका साकारणार आहे जी प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते.
डिस्ने प्लस हॉटस्टारने कर्मा कॉलिंग या वेब सीरिजचा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, "ना सत्ता, ना पैसा, ना नियम, इंद्राणीला कोणीही तोंड देऊ शकत नाही. जेव्हा ती तिच्या कर्मांचा सामना करेल तेव्हा काय होईल?"
पाहा ट्रेलर
'कर्मा कॉलिंग'ची स्टार कास्ट
कर्मा कॉलिंग या सीरिजमध्ये रवीना टंडनशिवाय वरुण सूद, विक्रमजीत विर्क, वालुशा डिसूझा, गौरव शर्मा, विराफ पटेल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवीना टंडनची 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिज 'रिवेंज' या अमेरिकन सीरिजवर आधारित आहे.
कधी रिलीज होणार सीरिज?
रवीना टंडनची 'कर्मा कॉलिंग' ही वेब सिरीज 26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन 'गिल्टी' फेम दिग्दर्शक रुचि नरेन यांनी केले आहे. सध्या रवीना बी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखलाजा 11' मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
रवीनाचा आगामी चित्रपट
रवीनाचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रवीनासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: