Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटाच्या रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर क्रिती आणि शाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये क्रिती आणि शाहिद यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नेटकऱ्यांना मिळत आहे.


कधी रिलीज होणार चित्रपट? (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Release Date)


क्रिती सेनॉन आणि शाहिद यांनी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या पोस्टरला क्रिती आणि शाहिद यांनी कॅप्शन दिलं, "या व्हॅलेंटाईन वीकमध्ये, एक अशक्य प्रेमकथा अनुभवा!" या पोस्टरवर या चित्रपटाची रिलीज डेट देखील लिहिली आली आहे. हा चित्रपट  9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


पाहा पोस्टर:






क्रिती सॅनन आणि शाहिद कपूर  यांचा हा चित्रपट मॅडॉक चित्रपट यांनी प्रोड्युस केला आहे. चित्रपटाच्या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला गायक राघवच्या 'तेरी बातों' हे गाणं ऐकू येत आहे.


क्रिती साकारणार रोबोटची भूमिका?


'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत असणार आहे. तर शाहिद कपूर हा एका रोबोटिक तज्ञाच्या भूमिकेत आहे, असं म्हटलं जात आहे. पण अजून क्रिती आणि शाहिद यांनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेची माहिती दिलेली नाही.


गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.तसेच क्रिती सेननचा आदिपुरुष हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. आता क्रिती आणि शाहिद यांच्या  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष