Pankaj Tripathi on Politics : हिंदी मनोरंजनसृष्टीतील सदाबहार अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. सध्या ते 'मै अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. पण बॉलिवूडसह ओटीटी विश्व गाजवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना मात्र राजकारणात करिअर करायचं होतं. 


राजकारणात करिअर करायची इच्छा होती : पंकज त्रिपाठी


एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पंकज त्रिपाठी म्हणाले,"बिहारमधला प्रत्येक जण राजकारणी आहे. राजकारणात एन्ट्री करण्याचा आणि त्यात करिअर करण्याचा माझा विचार होता. राजकारणात मी खूप पुढे जाऊ शकेल, असंही मला वाटलं होतं. पण एकदा अटक झाली आणि नंतर सर्वकाही बदललं. त्यानंतर मी हा विषय सोडून दिला. नाटक आवडत असल्याने अभिनयक्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला". 


पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले,"अभिनयक्षेत्रात रुची असल्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. राजकारणातील प्रवास थांबल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयक्षेत्राकडे पाऊले वळली. आजवर प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. मी एवढा यशस्वी होईल, अशी मी कधी कल्पना केली नव्हती. नाटकांमधून चांगले पैसे मिळत असते तर मी त्यातच रमलो होतो".


पंकज त्रिपाठींचा सिनेप्रवास (Pankaj Tripathi Movies)


पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी 2' (OMG 2) आणि 'फुकरे 3' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. त्यांची 'कडक सिंह' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर'मुळे त्यांना चांगली ओळख मिळाली आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेली सुल्तान कुरैशीची भूमिका चांगलीच गाजली. पंकज त्रिपाठी सध्या 'मैं अटल हूं' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. 'मेट्रो इन दिनो' आणि 'स्त्री 2' या सिनेमांचही ते शूटिंग करत आहेत.


'मैं अटल हूं' कधी रिलीज होणार? (Main Atal Hoon Release Date)


'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 'मैं अटल हूं' या सिनेमात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.


संबंधित बातम्या


Pankaj Tripathi : "तर भारतीय मतदारांच्या विवेकबुद्धीवर"; 'मैं अटल हूं' सिनेमाबाबत पंकज त्रिपाठी काय म्हणाला?