Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा वादग्रस्त कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच या कार्यक्रमाच्या मंचावर बॉलिवूडचा भाईजान सलमान आणि तब्बूने लग्नाचा प्लॅन रिवील केला आहे. 


'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या 'वीकेंड का वार' या भागात बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने एन्ट्री घेतली होती. यावेळी स्पर्धकांसोबत मजा-मस्ती करताना ती दिसून आली. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) या स्पर्धकांसोबत मजामस्ती करताना ती दिसून आली. तसेच लग्नाबद्दलही तिने आणि सलमानने खुलासा केला. 


'वीकेंड का वार'मध्ये तब्बूची एन्ट्री


'वीकेंड का वार' या कार्यक्रमात तब्बू स्पर्धकांसोबत मजामस्ती करताना दिसून आली. 'बिग बॉस'च्या मंचावर तब्बू येताच सलमान खान म्हणाला की,"तब्बू आणि माझं खूप चांगलं नातं आहे". सलमान आणि तब्बूच्या नात्याचं सर्वांनी कौतुक केलं.  


तब्बू अंकिताचं कौतुक करत तिला 'किती गोड' असं म्हणाली. तसेच विकीला नृत्य सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. तिने विकीला विचारलं की, लग्नात किती फेरे घेतले होतेस? यावर उत्तर देत तो म्हणाला,"चारपेक्षा अधिक फेरे घेतले होते. आणि या कार्यक्रमात सहभागी होतानाही सलमानने मला फेरे घ्यायला लावले होते. त्यावेळी मला वाटलं की भाईला असं वाटलं असेल "मी केलं नाही निदान तुम्ही तरी करा".


आम्ही व्हीलचेयरवर लग्न करू : सलमान खान 


विकीच्या बोलण्यावर तब्बू म्हणाली,"आम्ही लग्न केलं नाही आणि दुसऱ्याकडून करुन घेतलं. आता तुमचं लग्न झालं आहे माझं बाकी आहे". यावर सलमान खान म्हणाला,"आम्ही व्हीलचेयरवर लग्न करू. तिथून थेट आगीत जाणार आहोत".  


सलमान अन् अजय 'अनमोल रत्न'


तब्बूने सलमान खान आणि अजय देवगनला 'अनमोल रत्न' असं म्हटलं आहे. 'बिग बॉस 17'मधील सर्व स्पर्धक उत्तम खेळ खेळत असल्याचंही ती म्हणाली. 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.


'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? (Bigg Boss 17 Winner)


'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अनेक स्पर्धक सहभागी झाले. सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, मनारा चोप्रा, अरुण महाशेट्टी हे स्पर्धक आहेत. आता 'बिग बॉस 17'च्या घरातून कोण बाहेर पडणार आणि ट्रॉफी कोणाच्या नावे होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; सासूबाई 'लाथ' प्रकरणाबद्दल बोलताच भडकली अंकिता, म्हणाली...