Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


 


Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...


Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform :  'मिर्झापूर 3' ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मिर्झापूर 3 मध्ये सर्व जुन्या कलाकारांचा समावेश होणार का? मिर्झापूर 3 OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल? मुन्ना भैया अजून जिवंत आहे का? मालिकेत किती भाग असतील? असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 



Nikhil Chavan : 'लागीर झालं जी' फेम अभिनेत्याने स्वीकारलं 75 विद्यार्थ्यांचं पालकत्व, होतकरु विद्यार्थ्यांसाठी निखिल चव्हाणचा मदतीचा हात 



Nikhil Chavan : कलाकार मंडळी ही कायमच त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. पण अनेकदा याच कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातलही काही कामं मनाला भावतात. अशाच एका कलाकाराच्या समाजिक कार्याचा लैकिक सध्या केला जात आहे. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून निखिल चव्हाण (Nikhl Chavan) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'लागीर झालं जी' या मालिकेमुळे निखिल घराघरांत पोहोचला.'डंका' या आगामी चित्रपटातही निखिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..


 


सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं


Subodh Bhave :  सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  छोट्या पडद्यावर आता अभिनेता सुबोध भावेची (Subodh Bhave) महत्त्वाची भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर छोट्या पडद्यावर व्यक्तीरेखेसाठी होणार आहे. एआयच्या वापरावर काही कलाकारांनी टीका केली होती. या टीकाकारांना अभिनेता सुबोध भावेने सुनावले आहे. सोशल मीडियावरचा शहाणपण मला शिकवू नका असेही त्याने ठणकावले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना



Sidharth Malhotra Fan Fraud : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे भारताच नाही तर परदेशातही फॅन फॉलोअर्स आहेत. सिद्धार्थच्या परदेशातील चाहतीची ठगांनी 50 लाखांची फसवणूक केली आहे. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली असल्याचे सांगत त्याची सुटका करायची आहे, असे सिद्धार्थच्या चाहतीला सांगण्यात आले. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट


 Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer :  'मुंज्या' नंतर आता दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) आणखी एक हॉररपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची (Sonakshi Sinha) भूमिका असलेल्या ककुडा या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे. लग्नानंतर रिलीज होणारा हा सोनाक्षीचा पहिला चित्रपट आहे. रितेश सोनाक्षीसोबत साकीब सलीमदेखील या चित्रपटात झळकणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Shatrughan Sinha : रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन



Shatrughan Sinha Shares Health Update :  लेक सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर थेट भाष्य केले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली हेल्थ अपडेट देताना सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर सुरू असलेल्या चर्चांवर मौन सोडले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..