Nikhil Chavan : कलाकार मंडळी ही कायमच त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. पण अनेकदा याच कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातलही काही कामं मनाला भावतात. अशाच एका कलाकाराच्या समाजिक कार्याचा लैकिक सध्या केला जात आहे. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून निखिल चव्हाण (Nikhl Chavan) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'लागीर झालं जी' या मालिकेमुळे निखिल घराघरांत पोहोचला.'डंका' या आगामी चित्रपटातही निखिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटातही निखिल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून समाजातील नागरिकांना आलेल्या अडचणीवेळी त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसणार आहे. 'डंका'मधून खरा विठ्ठलच त्याच्या भक्तांच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चित्रपटातील हा मदतीला धावून जाणारा विठ्ठल खऱ्या आयुष्यातही अनेकांच्या उपयोगी पडतो.
स्वीकारलं 75 विद्यार्थ्यांचं पालकत्व
निखिल चव्हाण आणि अमित पवार यांच्या 'राजे क्लब'च्या वतीने शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील 75 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत हा विठ्ठल खरंच धावून आला आहे.मांजरी आणि शेवाळवाडी परिसरातील अत्यंत गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च निखिल चव्हाणच्या 'राजे क्लब' या संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. शिवाय त्यांच्या या मदतीचा दर तीन महिन्यांनी आढावाही घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. एक कलाकार असण्याबरोबरच माणुसकी जागवत निखिलने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.
निखिलने शेअर केली पोस्ट
निखिलने त्याच्या सोशल मीडियावरही ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'समाजकार्याची अखंड परंपरा जोपासत राजे क्लबच्या वतीने शेवाळवाडी व मांजरी जि. प. शाळेतील गरिब विद्यार्थांसाठी शैक्षणिक दत्तक योजना राबवत आहोत.या अंतर्गत 75 विद्यार्थांना शैक्षणिक वर्षामधे लागणारे सर्व साहीत्य क्लबच्या वतीने देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आपल्या परिसरातील नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले.'