Sidharth Malhotra Fan Fraud : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे भारताच नाही तर परदेशातही फॅन फॉलोअर्स आहेत. सिद्धार्थच्या परदेशातील चाहतीची ठगांनी 50 लाखांची फसवणूक केली आहे. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली असल्याचे सांगत त्याची सुटका करायची आहे, असे सिद्धार्थच्या चाहतीला सांगण्यात आले. 


सिद्धार्थ मल्होत्राच्या एका चाहतीची लाखोंची फसवणूक झाली. अभिनेत्याच्या नावावर असलेल्या फॅन पेजने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. याला बळी पडलेल्या चाहतीची  फसवणूक झाली. ज्या फॅन पेजवरून ही फसवणूक झाली, त्या फॅन पेजला सिद्धार्थ मल्होत्राही फॉलो करत असल्याचा दावा पीडितेने केला आहे. मीनू वासुदेव असे या चाहतीचे नाव असून ती अमेरिकेत राहते.


सिद्धार्थ मल्होत्राची चाहती असलेल्या मीनू वासुदेवने  म्हटले की, अलिजा आणि हुस्ना परवीन नावाच्या दोन मुलींनी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल खोट्या बातम्या तयार करून आपली फसवणूक केली. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या जीवाला धोका असल्याची खोटी बातमी त्यांनी तयार केली. कियारामुळे तिचा पती सिद्धार्थ धोक्यात आहे, असे तिला या ठगांनी पटवनू दिले. 


कियाराची काळी जादू, सिद्धार्थच्या जीवाला धोका... 


एक्स हँडलवर मीनू वासुदेवने सांगितले की,  हुस्ना परवीन आणि अलिजा या दोघी सिद्धार्थ मल्होत्राच्या फॅन पेजच्या ॲडमिन आहेत. कियाराने सिद्धार्थला धमकी देऊन लग्न केल्याचा दावा त्यांनी केला. कियाराने सिद्धार्थला धमकी दिली होती की, जर त्याने तिच्याशी लग्न केले नाही तर ती त्याच्या कुटुंबाला मारून टाकेल. मीनू वासुदेवच्या म्हणण्यानुसार, त्या दोन ॲडमिन मुलींनी तिला विश्वास दिला की कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली होती. सिद्धार्थचे आता बँक खातेही नाही. त्यानंतर अलिजा नावाच्या मुलीने अभिनेत्याची फॅन मीनूला सिद्धार्थला वाचवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.






सिद्धार्थच्या टीमचा भाग असल्याचे भागवले...


फसवणूक करणाऱ्या अलीजाने मीनूची सिद्दार्थच्या पीआर टीममधील दीपक दुबेसोबत बोलणं करून दिले आहे. या दीपक दुबेने कियाराच्या टीममधील राधिका नावाच्या मुलीसोबत आपल्या माहिती देणारी म्हणून ओळख करून देणारी व्यक्ती असल्याचे मीनूला सांगितले. 


मीनूने सांगितले की, ती दर आठवड्याला सिद्धार्थ आणि कियाराला त्यांच्याबद्दलची आतील माहिती जाणून घेण्यासाठी आणि सिद्धार्थशी बोलण्यासाठी पैसे देत होती. मीनू वासुदेवच्या म्हणण्यानुसार, दीपक दुबे हा देखील बोनस असल्याचे नंतर कळले. सिद्धार्थ मल्होत्रा ​​ज्याच्याशी तो फोनवर बोलत असे तोही बनावट निघाला. मीनू वासुदेवने बनावट सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यामध्ये फेक न्यूज, गिफ्ट हॅम्पर्स आणि सिद्धार्थच्या घरातील चित्रे यांचाही समावेश आहे. मीनूच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ मल्होत्राचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तिला 50 लाख रुपयांचे नुकसान झाले.


माझे पैसे मला परत द्या...


मीनू वासुदेवने आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. माझी फसवणूक करून पैसे उकळण्यात आले.  मला माझे पैसे हवेत अशी मागणी तिने केली.