Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform :  'मिर्झापूर 3' ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मिर्झापूर 3 मध्ये सर्व जुन्या कलाकारांचा समावेश होणार का? मिर्झापूर 3 OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल? मुन्ना भैया अजून जिवंत आहे का? मालिकेत किती भाग असतील? असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Continues below advertisement


मिर्झापूर 3 रिलीज तारीख आणि OTT प्लॅटफॉर्म


मिर्झापूर 3 दीर्घ प्रतीक्षेनंतर 5 जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजचे शेवटचे दोन सीझन चांगलेच हिट झाले होते. त्यामुळेच आता लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.






 


गुड्डूचे अनेक शत्रू...कोणाकोणाला भिडणार?


मागील सीझनमध्ये गुड्डू पंडितने आपला सूड उगवताना अनेकांना शत्रू बनवले आहेत. मुन्ना भैय्याला संपवलं,  कालीन भैय्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. आता कालीन भैय्याची फौज त्याच्या मागे लागली आहे. माधुरी यादव, छोटे शुक्लासोबत इतर काहीजण  कालीन भैय्यासाठी झगडणार आहेत. या सगळ्यांच्या रडारवर  गुड्डू पंडित आहे. त्याला संपवण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत. 


मिर्झापूर 3 रिलीज किती वाजता होणार रिलीज?


पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका असलेली वेब सीरिजचे  दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. 'मिर्झापूर-3' ही वेब सीरिज मध्यरात्रीच रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. 


'मिर्झापूर 3' मध्ये किती एपिसोड असतील?


'मिर्झापूर-3'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकांना तो खूप आवडला होता. यासोबतच यावेळी शोमध्ये किती एपिसोड असतील असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. मिर्झापूर सीझन 1 मध्ये 9 एपिसोड होते, तर दुसऱ्या सीझनमध्ये 10 एपिसोड होते. आता मिर्झापूर 3 मध्येही एकूण 9 किंवा 10 भाग असण्याची शक्यता आहे.



मिर्झापूर ३ मध्ये जुने कलाकार असतील का?


दिव्येंदू शर्मा, विक्रांत मॅसी आणि श्रिया पिळगावकर यांच्यासह आठ कलाकार तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार नाहीत. याशिवाय पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, ईशा तलवार, विजय वर्मा आणि अंजुम शर्मा आदी या वेब सीरिजचा भाग असणार आहेत.  या यादीत पंचायत फेम जितेंद्र कुमार म्हणजेच सचिवजी देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :