मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने आपला तपास सुरु केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय मुंबईत या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आता सीबीआय अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून तिला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचंही बोलंलं जात आहे. काल (रविवारी) सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. यावेळी सिद्धार्थला रिया चक्रवर्तीबाबात प्रश्न विचारण्यात आला. सीबीआयने चौकशी दरम्यान, सिद्धार्थलसा विचारलं की, रिया घर सोडून का गेली? तसेच सीबीआयने काल पुन्हा सुशांतच्या घरी तब्बल साडे तीन तास तपास केला.


काल डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयकडून सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह आणि दीपेश सावंत यांची चौकशी करण्यात आली. सीबीआयने याआधीही या तिघांची चौकशी केली आहे. परंतु, रविवारी या तिघांचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. पहिल्यांदा सिद्धार्थ आणि नीरज यांना समोरा-समोर बसवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर नीरज आणि दीपेश यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सिद्धार्थ आणि दीपेश यांची चौकशी करण्यात आली.


रविवारी पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली सीबीआयची टीम


सीबीआयची टीम रविवारी पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या घरी तपासासाठी गेली होती. यामागील हेतू हाच होता की, सिद्धार्थ, नीरज आणि दीपेश यांनी सुशांतच्या मृत्यूसंदर्भात जी माहिती दिली. त्यामध्ये कोणताही विरोधाभास तर नाही. किंवा हे तिघं कोणतीही गोष्ट लपवत तर नाहीत. त्यानंतर जवळपाप दुपारच्या वेळी अडीच वाजता सीबीआयची टीम एफएसएलच्या एक्सफर्ट्स आणि सिद्धार्थ, नीरज आणि दीपेश यांच्यासोबत सुशांतच्या घरी तपासासाठी पोहोचली.


यामागील हेतू शनिवारी सुशांतच्या घरी करण्यात आलेली चौकशीचं विश्लेषण करण्याचा होता. रविवारी सीबीआयने सुशांतच्या बिल्डिंगच्या समोरील भागातील व्हिडीओग्राफी करण्यात आली. तर शनिवारी बिल्डिंगच्या मागील भागातील व्हिडीओग्राफी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त सीबीआयची टीम सुशांतच्या रूममध्ये म्हणजेच, जिथे सुशांतचा मृतदेह सापडला होता तिथेही सीबीआयच्या पथकाने पाहणी केली. पुन्हा एकदा त्या खोलीचं मॅपिंग करण्यात आलं.


पाहा व्हिडीओ : सुशांत प्रकरणी तपासासाठी सीबीआयचा मास्टर प्लॅन, CBIच्या रडारवर कोण?



सीबीआयचा सखोल तपास सुरु


सीबीआयच्या टीमने पुन्हा विश्लेषण केलं. कारण नीरजने दिलेल्या जबाबानुसार, जेव्हा खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा एसी सुरु होता आणि लाईट बंद होती. त्यामुळे सीबीआयला हे जाणून घ्यायचं होतं की, लाईट बंद असल्यानंतरही खोलीतील सुशांतचा मृतदेह दिसत होता की, नाही. सीबीआयच्या टीमने सुशांतच्या ड्युप्लेक्स फ्लॅटचे मालक संजय लालवानी यांचीही चौकशी केली. सुशांतने वांद्रे वेस्ट मोंट ब्लेंक बिल्डिंगच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील 4 फ्लॅट्स 3 वर्षांसाठी भाड्याने घेतले होते. दर महिन्याचं भाडं 4 लाख 50 हजार रुपये होतं. जे दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढणार होतं.


सीबीआयने कूपर हॉस्पिटलाचाही केला दौरा


9 डिसेंबर 2019 रोजी जो डुप्लेक्स फ्लॅट 2022 पर्यंत भाड्याने घेतला होता. त्याची अॅग्रीमेंट कॉपी घेऊन सीबीआय त्या घराच्या मालकापर्यंत पोहोचली. सुशांतने घर भाड्याने घेण्यासाठी पैसे चेकने दिले होते की, कॅशमध्ये याची चौकशी सीबीआयने केली. तसेच सीबीआयची टीम रविवारी वॉटर स्टोन हॉटेलमध्येही पोहोचली होती. परंतु, रविवार असल्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट स्टाफ सुट्टीवर होता. त्यामुळे सीबीआयची टीम पुन्हा परतली. या हॉटेलमध्ये रिया आणि सुशांत आले होते. असं येथील सिक्युरिटी इंचार्जचं म्हणणं आहे. सीबीआयच्या टीमने शनिवारी कूपर हॉस्पिलचाही दौरा केला होता. याच हॉस्पिटलमध्ये सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आला होता.


महत्त्वाच्या बातम्या :