एक्स्प्लोर
Advertisement
केदारनाथचा थरारक ट्रेलर लाँच
अनेक अडथळे पार करत सारा अली खानचा डेब्यू असलेल्या केदारनाथ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा डेब्यू असणारा केदारनाथ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटाच्या टीझरप्रमाणेच ट्रेलरदेखील थरारक असा आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाची कथा घेऊन तयार केलेल्या केदारनाथ या चित्रपटात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे.
केदारनाथमधील नयनरम्य स्थळं, दृष्यं या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहेत. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटात चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांत सिंग राजपूतने नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केला असल्याचे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला केदारनाथ
केदारनाथ हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. तसेच आता केदारनाथमधील पुजाऱ्यांनीदेखील त्यास विरोध केला आहे. त्यामुळे चित्रपटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
याअगोदर निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या दोघांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न सुशांत आणि साराच्या फॅन्सना पडला होता. केदारनाथचे शूटिंग सुरू असतानाच निर्माती प्रेरणाने निर्मितीतून माघार घेतली. त्यानंतर उर्वरीत चित्रपट कसा करणार हा प्रश्न दिग्दर्शकासमोर उभा राहिला होता. परंतु रोनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यानंतर चित्रपटासमोरील अडचणी कमी झाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement