मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एडीआर संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण सीबीआयकडे अद्याप ट्रान्सफर झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. तेव्हा मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला होता. म्हणजेच, मुंबई पोलिसांच्या मते, अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळेच झाला असून यात संशयास्पद कोणतीच बाब नाही.


गृहमंत्री सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, ''सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आद्यार सीबीआयकडे गेलेलं नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 11 तारखेला यासंदर्भात निकाल येईल. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणतंही कारण नाही'

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी जोर धरत होती. परंतु, सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट फाइल केला होता. मुंबई पोलिसांना याप्रकरणी कोणतीही संशयास्पद बाबा आढळून आली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं नाही.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतचे वडिल के. के. सिंग यांनी बिहार पोलिसांत रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे. दरम्यान, सुशांत सिंहचे वडिल के. के. सिंह यांनी सीआरपीसी कलम 154 अंतर्गत याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :