मुंबई : सध्या सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. मोठे बॅनल मोठ्या स्टार्सच्या मुलांना लॉंच करत असतात असा ठपका अनेक लोक ठेवतात. ही मंडळी लॉंच करताना आपला हेतू साध्य करत असतात असंही बोललं गेलं. हे प्रकरण ताजं असतानाच, आता यशराज या बड्या बॅनरने आपल्या नव्या सिनेमात जुनैद खानला लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जुनैद म्हणजे, आमीर खानचा मुलगा.
आदित्य चोप्रा आता आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करतोय. त्यासाठी त्याला नवा चेहरा हवा आहे. धूमच्या सीरीज पासून आमीर खान आणि आदित्य चोप्रामधले संबंध कमालीचे चांगले झाले. त्याचाच भाग म्हणून की काय, पण येत्या काळात आमीर खानच्या मुलाला यशराज बॅनर लॉंच करणार आहे. जुनैद हा आमीरच्या महिल्या पत्नीचा मुलगा. जुनैदला सिनेमाचं आकर्षण आहेच.
आमीर त्याच्यासोबत सिनेमाच्या चर्चाही करत असतो. आता जुनैदने इंडस्ट्रीत येऊन अभिनयाची इनिंग खेळायची ठरवली आहे. या बाातमीबद्दल ना यशराज बॅनर काही बोलत आहे ना आमीरच्या गोटातून यावर स्पष्टीकरण दिलं जात आहे. अर्थात ही चर्चा खोडून कुणीच काढलेली नाही. जुनैदला लॉंच करतानाच त्याला सध्या अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्यानंतरच जुनैद चित्रिकरणाला सुरूवात करेल.
इंडस्ट्रीचं लक्ष केवळ दोन चित्रपटांवर!, 'गुंजन सक्सेना', 'सडक 2'ला नेपोटिझमची गडद किनार
जुनैदच्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या सिनेमाच्या कामाला लॉकडाऊन पूर्णपणे उठवल्यानंतर सुरूवा होणार आहे. त्या वेगाने चित्रपटाचं चित्रिकरण पुढ्च्या वर्षी सुरू होईल. आणि सिनेमाही पुढच्या वर्षीच्या उत्तरार्धात रिलीज होईल अशी चर्चा आहे. एकिकडे नेपोटिझमवर चर्चा होत असतानाच आदित्य चोप्राने आमीरच्या मुलाला लॉंच करणं म्हणजे त्या निमित्ताने पुन्हा एकदा नेपोटिझम अधोरेखित झालं आहे.
करण जोहरला तूर्त डच्चू, नेपोटिझमवरुन उफाळलेल्या वादाचा 'गुंजन सक्सेना'ला फटका!
आमीरचा मुलगा येतोय रे! यशराज करणार लॉंच?
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
08 Aug 2020 01:35 PM (IST)
आदित्य चोप्रा आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करतोय. त्यासाठी त्याला नवा चेहरा हवा आहे.
नव्या सिनेमात जुनैद खानला लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जुनैद म्हणजे, आमीर खानचा मुलगा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -