(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन विठूरायाच्या चरणी नतमस्तक; ट्वीट करत शेअर केले फोटो
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशी निमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Amitabh Bachchan : महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील मुंबईतील सायन परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेतलं आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत बिग बींनी चात्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
T 4342 - चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 10, 2022
विठ्ठल विठ्ठल जय हरी || जय विठ्ठल विठ्ठल जय हरी ||
आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा ..💐🚩 pic.twitter.com/LKKCvcmTii
ट्वीट करत बिग बींनी लिहिलं आहे, "चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी...विठ्ठल विठ्ठल जय हरी || जय विठ्ठल विठ्ठल जय हरी || आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा.."
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी विठ्ठल आणि रखुमाई यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना केली होती. तसेच डॉक्टरांचे आभार मानले होते. सध्या अमिताभ बच्चन यांचे पूजेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या