![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
![Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती Sunny Leone Injured During Film Shoot Cut on Her Toe Shared video on Instagram Watch video Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/31/59ae91ee7ecd217595296ab76cbbac371675165109209254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunny Leone Injured : अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनी सध्या 'ओह माय घोस्ट' (Oh My Ghost) या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती जखमी (Sunny Leone Injured) झाली आहे.
सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने दुखापतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या पायातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. तसेच सेटवरील मंडळी सनीवर प्राथमिक उपचार करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सनी लिओनीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झालेली दुखापत गंभीर नाही. पण तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी घाबरलेली दिसत आहे. चाहते कमेंट्स करत सनीला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत. छोट्या दुखापतीचा मोठा बाऊ केल्याबद्दल तिची थट्टा करत आहेत.
सनी लिओनीबद्दल जाणून घ्या...
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 54 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लोकप्रिय आहे. 'एडल्ट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सनीचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' (The Battle of Bhima Koregaon) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अर्जुन रामपालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच तिचा 'ओह माय घोस्ट' (Oh My Ghost) हा सिनेमादेखील लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सनी राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
सनी लिओनीने अभिनयाबरोबर नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती 'रोडीज' या कार्यक्रमातदेखील सहभागी झाली होती. नुकतीच तिची 'अनामिका' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या वेबसीरिजमध्ये बोल्ड सनीचा अॅक्शन मोड पाहायला मिळाला. सनी अभिनय, नृत्य आणि शोजमधून कोट्यवधी रुपये कमावते.
संबंधित बातम्या
Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)