एक्स्प्लोर

Sunny Deol Bobby Deol : सनीच्या देओलच्या बोलण्यावर बॉबी ढसाढसा रडला, आमच्यावर आता...; व्हिडीओ होतोय व्हायरल

Sunny Deol Bobby Deol : बॉबी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सनी देओलच्या एका वाक्याने बॉबीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसत आहे.

Sunny Deol Bobby Deol :  बॉलिवूडमध्ये जवळपास पाच दशकांपासून देओल कुटुंबाने  सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यानंतर त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओलने (Bobby Deol) सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्यापैकी बॉबी देओलची अभिनयातील पहिली इनिंगही फ्लॉप झाल्यानंतर त्याची दुसरी इनिंग चांगली झोकात सुरू झाली आहे. 'आश्रम' या वेब सीरिजपासून (Web Series) बॉबीच्या करिअरची गाडी सुस्साट धावत आहे. बॉबी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सनी देओलच्या एका वाक्याने बॉबीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसत आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये  येत्या एपिसोडमध्ये आता सनी देओल आणि बॉबी  देओल दिसणार आहेत. मागील एपिसोडमध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. आता, सनी आणि बॉबी देओल कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या प्रोमोमध्ये बॉबी देओल आणि सनी देओल यांनी आपल्या स्वॅगसह एन्ट्री केली. प्रोमोमध्ये सनी देओलने मागील काही वर्षांमध्ये देओल कुटुंबीयांना मिळालेल्या चांगल्या दिवसांबद्दल भाष्य केले. 
सनी देओलने म्हटले की, 1960 पासून आमचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे सांगितले जाते. मात्र, मागील काही वर्ष चांगली गेली नव्हती. पण जेव्हा माझ्या  मुलाचे लग्न झाले. त्यानंतर 'गदर 2' प्रदर्शित झाला. त्याआधी वडिलांचा चित्रपट झळकला. विश्वासच वाटत नव्हता की देवाची आमच्यावर कृपा सुरू झाली आहे. त्यानंतर अॅनिमल चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर असं वाटलं की आम्ही आता यश मिळवले आहे. 

बॉबीच्या डोळ्यात अश्रू

सनी देओल एका बाजूला हे सगळं सांगत असताना दुसरीकडे बॉबी देओलच्या डोळ्यात अश्रू तरळले. बॉबी देओल आपल्या सेकंड इनिंगमध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. ओटीटी पासून ते सिल्वर स्क्रिनवर बॉबीच्या अभिनयाची जादू दिसू लागली आहे. कधीकाळी मिमर्सच्या  थट्टेचा विषय असलेल्या बॉबीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Team Kapil Sharma (@team.kapilsharma)

सनी देओलने सांगितला धर्मेंद्र बाबतचा किस्सा

सनी देओलने या शो मध्ये वडील धर्मेंद्र यांच्याबाबतचाही किस्सा सांगितला आहे.  सनी देओलने सांगितले की, धर्मेंद्र म्हणतात की, माझ्यासोबत बस आणि माझ्या मित्रासारखा हो असे म्हणतात. पण, मी  त्यांना म्हणतो की मी तुम्हाला मित्र म्हणून सगळ्या गोष्टी सांगतो तर तुम्ही लगेच वडील होता, यावर एकच हास्यकल्लोळ उडतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget