Kapil Sharma-Sunil Grover Come Together: मी डिस्टर्ब झालो होतो... कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर सुनील ग्रोव्हरने सांगितली मानसिक स्थिती
Kapil Sharma-Sunil Grover Come Together: सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोमध्ये गुत्थी, डॉक्टर गुलाटी अशा व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. पण, 2017 मध्ये झालेल्या भांडणामुळे दोघांनी वेगळी वाट निवडल्याने चाहत्यांना धक्का बसला.
Kapil Sharma-Sunil Grover Come Together : कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' (पहिला सीझन) आणि 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हे दोन्ही खूप गाजले. कपिलची संपूर्ण टीमही लोकप्रिय झाली. यामध्ये कपिलच्या तोडीस तोड सुनील ग्रोव्हरनेही (Sunil Grover) काम केले. सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोमध्ये गुत्थी, डॉक्टर गुलाटी अशा व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. पण, 2017 मध्ये झालेल्या भांडणामुळे दोघांनी वेगळी वाट निवडल्याने चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर चाहत्यांनी दोघांनी एकत्र काम करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आता ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे.
सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा हे दोघेही नेटफ्लिक्सच्या शोमध्ये एकत्र येत आहेत.या शोची चाहत्यांना उत्सुकता लागली. कपिलसोबत भांडण झाल्यानंतर आपली मानसिक स्थिती कशी होती, यावर पहिल्यांदाच सुनीलने भाष्य केले आहे. इंडियन एक्स्प्रेससोबत दिलेल्या मुलाखतीत सुनीलने भाष्य केले.
कपिल शर्मा शोमध्ये सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडीची खूप चर्चा झाली होती. लोकांना तो खूप आवडला. आता सात वर्षांनंतर दोघे पुन्हा एकत्र येत आहेत. सुनीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणाने बोलले, कपिलसोबतचे त्याचे मतभेद आणि माध्यमांमध्ये आलेली नकारात्मक चर्चा यावर मौन सोडले.
मी अस्वस्थ होतो...
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने सांगितले की, तो सुरुवातीला थोडासा अस्वस्थ होतो, पण आता नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर सुनील म्हणाला, 'असं करणाऱ्यांना मी का उत्तर देऊ? मला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, मी तसे करेन, परंतु मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असेही त्याने म्हटले.
View this post on Instagram
'नकारात्मक गोष्टींकडे लक्ष वेधले जाते'
सुनीलने सांगितले की, लोकांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती नाही. त्यांच्याकडे कोणतेही तथ्य असलेली माहिती नाही. काहीही बोलणे हेच लोकांचे काम आहे. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने पुढे म्हटले की, 'नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते. या सर्व लोकांना नंतर सर्व काही समजेल.
फ्लाइटमध्ये झाली होती दोघांमध्ये हाणामारी
2017 मध्ये सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यात भांडण झाले होते. हे दोघेही आपल्या टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांच्यात काही गोष्टीवरून भांडण झाले होते. यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबत काम करणे बंद केले. कपिलने सुनीलची जाहीर माफी मागितली होती. मात्र सुनील शोमध्ये परतला नाही. आता 7 वर्षांनंतर हे दोन मित्र एकत्र येणार आहेत.