Suhana Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्समध्ये एक आहे. शाहरुखच्या लाडक्या लेकीने मागील वर्षी जोया अख्तरच्या (Zoya Akhtar) 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. आज सुहानाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या...


अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत अफेअर


अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agastya Nanda) सुहाना खान रिलेशनमध्ये (Suhana Khan Relationship With Agastya Nanda) असल्याची चर्चा आहे. दोघांची पहिली भेट जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाच्या सेटवर झाली. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुहाना आणि अगस्त्यची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याचं म्हटलं जातं. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अगस्त्याने आपला वाढदिवसदेखील सुहानासोबत साजरा केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोघांनी अद्याप अफेअरच्या चर्चांवर काहीही भाष्य केलेलं नाही. 


सुहाना खान करतेय शाहरुखला कॉपी


'द आर्चीज' या चित्रपटातील दोन गाणी गणेश हेगडे यांनी कोरियोग्राफ केली आहेत. गणेशने शाहरुख खानसोबतही काम केलं आहे. त्यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं होतं की, सुहाना खान वडील शाहरुख खानवर गेली आहे.  एखादी गोष्ट परफेक्ट होत नाही तोपर्यंत सुहाना खान ती गोष्ट करत राहते. हार मानायला सुहानाला आवडत नाही. वडिलांप्रमाणे तीदेखील खूप मेहनती आहे". 


'या' चित्रपटात शाहरुख-सुहाना एकत्र झळकणार


शाहरुख खान आणि सुहाना खान 'किंग' (King) या अॅक्शन, थ्रिलर चित्रपटात एकत्र झळकणार आहे. 'किंग' या चित्रपटात शाहरुख खान डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर लेक सुहाना खान चित्रपटात त्याची शिष्य म्हणून दिसेल. सुजॉय घोषने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


कोण आहे सुहाना खान? (Who is Suhana Khan) 


सुहाना खानचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं आहे. शाहरुख खानमुळे लहानपणापासूनच ती चर्चेत असते. सुहानाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. शाहरुख, सुहाना आणि आर्यन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


KKR vs SRH : शाहरुख खाननं भरमैदानात ऑनकॅमेरा आकाश चोप्रा, रैना अन् पार्थिवला सॉरी म्हटलं, नेमकं काय घडलं? Video